भिवंडी : भिवंडी (Bhiwandi) शहरामध्ये मागील काही दिवसांपासून सोनसाखळी चोरीच्या (Crime) घटनांमध्ये प्रकर्षाने वाढ झाल्याचं चित्र आहे. त्याचमुळे पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी पोलिसांना आपापल्या क्षेत्रामध्ये गस्त वाढवून नाकाबंदी करण्याचे आदेश दिले होते. पोलिसांच्या या कारवाईला यश आल्याचं पाहायला मिळतयं. भिवंडी शहर पोलीस ठाण्यातील गणेश हरणे आणि लहू गावित या दोघा पोलिसांनी पाठलाग करून चोरट्यांना पकडले. सोनू गोविंद पाल आणि कमलाकर गणपत डोंगरे अशी या चोरट्यांची नावे आहेत. यामधील सोनू हा सेल्समन होता तर गणपत हा कुरिअर बॉयचे काम करत होता.
या चोरट्यांकडून 8 लाख 61 हजार रुपये किमतीचे 28 तोळे सोने आणि 50 हजार रुपये किमतीची एक दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला. याचवेळी पोलिसांनी एकूण नऊ गुन्हे उघडकीस आणले. यामध्ये पोलिसांनी चोरीचे सोने करणाऱ्यासह तिघांना अटक केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
भिवंडीत सोनसाखळी चोरांचा सुळसुळाट
भिवंडी शहरात वाढत्या सोनसाखळी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी सहाय्यक पोलीस आयुक्त दीपक देशमुख,वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतन काकडे,पोलिस निरीक्षक दीपक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश हरणे आणि लहू गावित हे गस्त घालीत होते. त्याचवेळी पद्मानगर भागात दोघे संशयित दुचाकी वरून जाताना आढळून आलं. या दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांनी चोरांच्या दुचाकीस धडक दिली. त्यामुळे त्यांची दुचाकी पडली आणि एक चोर पोलिसांच्या ताब्यात आला.
नऊ घटना उघडकीस
दुसरा चोर हा जवळच असलेल्या इमारतीच्या टेरेस वरून पोलिसांच्या डोळ्यात मिर्ची पावडर स्प्रे मारून पळून जात होता. त्याचवेळी पोलिसांनी त्याला इमारतीच्या डक मधून उतरत असताना पकडले. उल्हासनगरमध्ये राहणार सोनू गोविंद पाल आणि भिवंडीत राहणर कमलाकर गणपत डोंगरे अशी या चोरट्यांची नावे आहेत. त्यांची पोलिसांनी कसून केली असता शहर पोलीस ठाणे हद्दीतील आठ आणि मानपाडा पोलीस ठाणे हद्दीतील एक अशा नऊ घटनांची उकल करण्यात आलीये.
दरम्यान या चोरांनी चोरी केलेल्या सोन्याचा तपास केला असता त्यांनी चोरलेले सोने आपला साथीदार स्वप्नील गजानन हरड याच्या मार्फत विकले. त्याने नाशिक जिल्ह्यातील घोटी येथे श्री साईसंत ज्वेलर्स याला विकल्याचे कबूल केले. दरम्यान पोलिसांनी 8 लाख 61 हजार रुपये किंमतीचे 28 तोळे सोने आणि गुन्हे करण्यासाठी वापरण्यात आलेली 50 हजार किमतीची दुचाकी जप्त केली. विशेष म्हणजे पोलिसांनी पकडलेले दोघे सोनसाखळी चोरटे हे सराईत गुन्हेगार असल्याचं समोर आलं.
हेही वाचा :
उधारीवर किराणा दिला नाही म्हणून दगडफेक, दुकानचालक माय लेकीसह वाचवण्यासाठी आलेल्या दिराला मारहाण