Bhandara News भंडारा : कत्तलखान्याकडं जाणाऱ्या जनावरांची सुटका करून त्यांचं संरक्षण व्हावं, यासाठी सर्व जनावरं गौशाळेत जमा करण्यात आली. मात्र, गौशाळेच्या संचालकांनी पोलिसांनी जमा केलेलीचं जनावरं न्यायालयाच्या कुठल्याही आदेशाविना बनावट हमी पत्रावर परस्पर विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार भंडाऱ्याच्या लाखनी तालुक्यात उघडकीस आला. सन 2009 ते 2023 या 14 वर्षाच्या काळात हा सर्व गोरखधंदा गौशाळेच्या संचालकांनी केल्याची तक्रार लाखनी पोलिसांना प्राप्त झाली होती. या गंभीर प्रकरणाची चौकशी लाखनीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष चिलांगे यांनी केली, यात हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे.
पाच गौशाळेच्या 33 संचालकांविरोधात गुन्हा दाखल
भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि नागपूर या जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांनी कारवाई करून कत्तलखान्याकडं जाणाऱ्या जनावरांना लाखनी तालुक्यातील पिंपळगाव येथील अन्नपूर्णा गोरक्षण संस्था, भवानी गौशाळा, निर्मल गौशाळा, सुकृत गौशाळा तर रेंगेपार येथील मातोश्री गौशाळेत संरक्षणासाठी जमा केली होती. या गंभीर प्रकरणात लाखनी तालुक्यातील पिंपळगाव आणि रेंगेपार येथील या पाच गौशाळेच्या संचालकांनी त्यांच्याकडं पोलिसांनी सुपूर्द केलेली सुमारे दहा हजार जनावरं परस्पर विकल्याचं स्पष्ट झालं.
याप्रकरणी लाखनी पोलिसांनी पाचही गौशाळेच्या 33 संचालकांविरुद्ध कलम 406, 420, 467, 468, 471, 34 भादंवी नुसार गुन्हा दाखल केला आहे. मागील दोन वर्षात भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातही अशाच प्रकारे गौशाळेतील जनावरांची विक्री परस्पर केल्याच्या प्रकरणी पवनीत दोन पेक्षा अधिक गौशाळेवर गुन्हे दाखल आहेत. आता यानंतर लाखनी तालुक्यातील या पाच गौशाळेवर गुन्हे दाखल केल्यानं जनावरांची विक्री करणारं मोठं रॅकेट समोर येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
देवळी पेंढरी नाजीक ट्रॅव्हल्स पलटी , एका 19 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू
नागपूर आणि वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या देवळी पेंढरी या गावानजीक असलेल्या घाटामध्ये ज्युनिअर महाविद्यालयाचे विद्यार्थी घेऊन वर्ध्यातून परत नागपूरला जात असलेल्या ट्रॅव्हल्सला अपघात झालाय. जंगल घाटामध्ये ट्रॅव्हल्स पलटी झाली असल्याची माहिती आहे. यात एका 19 वर्षीय विद्यार्थीनीचा जागीच मृत्यू झाला असून काही विद्यार्थी जखमी झाले आहे. ट्रॅव्हल्समध्ये 52 विद्यार्थी प्रवास करीत असल्याची माहिती आहे. यातील विद्यार्थी हे सरस्वती विद्या मंदिर शाळेचे असल्याची माहिती समोर येते आहे. वर्ध्यात ट्रेंनिग साठी विद्यार्थी गेले असल्याची माहिती.
हे ही वाचा