Viral Video Crime News : घटस्फोट दे, अन्यथा तुझे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करतो म्हणून पत्नीला धमकी देणाऱ्या पतीला पोलिसांनी अटक केली आहे. बेळगावमध्ये ही धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीच्या धमकीला वैतागून पत्नीने थेट सायबर पोलिसांमध्ये तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी पतीला अटक केली. 


बेळगावातील रहिवासी असलेल्या किरण पाटील याने स्वतःच्या पत्नी सोबतचे खासगी क्षण व्हिडिओ रेकॉर्ड केले होते. या खासगी क्षणाचा व्हिडीओचा वापर किरणने पत्नीला धमकावण्यासाठी केला.  किरण याने पत्नीला व्हिडिओ दाखवून मला घटस्फोट दे नाही तर सोशल मीडियावर तुझे व्हिडिओ व्हायरल करतो म्हणून धमकवण्यास सुरुवात केली. किरण याला पत्नी आणि नातेवाईकांनी बऱ्याच तऱ्हेने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण किरण  घटस्फोट पाहिजे या मागणीवर ठाम होता.


अखेर पत्नीने सायबर पोलीस स्थानकात पती अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत असल्याची  तक्रार केली. त्याची दखल घेऊन पोलिसांनी त्वरित कार्यवाही करून किरणला ताब्यात घेण्याची तयारी केली. किरण याला ताब्यात घेण्यास गेलेल्या पोलीस पथकाच्या समोर किरण याने विष प्राशन करण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी तो प्रयत्न उधळून लावला. किरण याला अटक करून त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली आहे. 


तीन अल्पवयीन तरुणींशी इन्स्टावर ओळख अन् लॉजवर नेत लैंगिक अत्याचार


सांगली जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. तीन तरुणांनी इन्स्टाग्रामवरुन (Instagram) तीन अल्पवयीन तरुणींशी ओळख वाढवली. त्यानंतर फिरायला जाऊ असे सांगत तिन्ही अल्पवयीन मुलींना लॉजवर नेलं. त्यानंतर तिघांनी तीन मुलीसोबत लैंगिक आत्याचार केले. याप्रकरणी तिन्ही तरुणांविरोधात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. तिन्ही तरुणांना पोलिसांनी (police) बेड्या ठोकल्या आहेत. आटपाडी पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.


एकाच गावातील तीन अल्पवयीन मुलींशी आधी इन्स्टाग्रामवरून संपर्क साधत तीन तरुणांनी ओळख वाढवली. त्यानंतर याच मुलींना या तीन तरुणांनी फिरायला जाऊ असे सांगत लॉजवर नेऊन लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात घडली आहे. तीन तरुणांच्या या कृत्याचा प्रकार समोर आल्यानंतर  पीडित मुलींनी आपल्या कुटुंबासोबत आटपाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यानंतर  संशयित पांडुरंग हनुमंत यमगर, सुभाष यमगर (दोघे रा. बनपुरी, ता. आटपाडी), किरण बाळासाहेब शेंडगे (रा. शेंडगेवाडी, ता. आटपाडी) या युवकांविरूद्ध 'पोक्सो' अंतर्गत  आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आटपाडी पोलिसांनी तिघांनाही तात्काळ अटक केली आहे.