Beed Crime: बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात दरोड्याची भयंकर घटना समोर आली आहे. हा दरोडा एवढा भयंकर होता की या घटनेमुळे संपूर्ण शहर हादरलंय. आष्टीतील केरळ गावातील भागवत वस्तीवर टाकण्यात आलेल्या या सशस्त्र दरोड्यात महिलांना जबर मारहाण करण्यात आली असून दरोडेखोरांनी दीड वर्षाच्या बाळालाही सोडलं नाही. महिलांच्या अंगावरील सर्व दागिने लंपास करत निर्दयी दरोडेखोरांनी आणखी चार जणांना बेदम मारलंय. दरम्यान या घटनेने सध्या परिसरात मोठी दहशत पसरली असून पोलीस प्रशासनाचा मोठा फौज फाटा या ठिकाणी दाखल झाला असून घटनेचा तपास करत आहे.
दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकत केली जबर मारहाण
बीडच्या आष्टी तालुक्यातील केरूळ येथील भागवत वस्तीवर सशस्त्र दरोडा टाकण्यात आला आहे. या घटनेमध्ये चार जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर अहमदनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दरोड्यात दरोडेखोरांनी महिलांच्या अंगावरील सर्व दागिने लंपास केलेत. तर हे निर्दयी दरोडेखोर एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी त्यातील चार जणांना बेदम मारहाण केली. यात एका दीड महिन्याच्या बाळाचा देखील समावेश आहे.
दरोडेखोरांची महिलांना बेदम मारहाण
दरोडेखोरांनी घरात घुसत एका हातात दीड वर्षाच्या बाळाला धरत दुसऱ्या हाताने महिलेचा गळा घोटल्याचे महिलेने सांगितले. यावेळी त्यांनी गळ्यातले सगळे दागिने खेचत बाळासह महिलेलाही जबर मारहाण केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आजूबाजूला बसलेल्या महिलांच्या गळ्यात कोणताही दागिना नव्हता. महिलेचे बाळ रडत होते. दरोड्याच्या या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून दरोडेखोरांचा तपास करण्यासाठी मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे.
संभाजीनगरच्या घटनेनं हादरलं समाजमन
छत्रपती संभाजीनगरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. आंतरधर्मीय प्रेमविवाह (Marriage) केल्याच्या रागातून मुलीचे वडील आणि चुलत भावाने जावयावर चाकूने गंभीर वार करून हत्या केली. बापानेच जातिभेदापोटी मुलीचं कुंकू पुसलं. पण, पतीच्या निधनाने मुलीने टाहो फोडला असून माझ्या निर्दयी बापाला फाशी द्या, अशा शब्दात मुलीने संताप व्यक्त केला आहे. संभाजीनगरच्या (Sambhajinagar) इंदिरानगर भागातील या घटनेनं महाराष्ट्र हादरला असून मृत्यू झालेल्या अमितच्या कुटुंबीयांनीही टाहो फोडत मुलाच मृतदेह पोलीस (Police) स्टेशनमध्ये ठेवला होता. आरोपीला अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह घेऊन जाणार नाही, असा संताप व्यक्त केला होता. दरम्यान, अमितवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते, 12 व्या दिवशी त्याने अखेरचा श्वास घेतला.