Beed Crime: बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याचा रागात सरपंचाने शेतकऱ्यावर थेट तलवारीने हल्ला केला आहे. शुक्रवारी सकाळी झालेल्या या घटनेची दृश्य सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहेत.


शेतीच्या वादातून ही घटना घडल्याचे सांगण्यात येत असून दोन्ही कुटुंबात पूर्वीपासून वाद असल्याचे सांगण्यात येत आहे.


पोलीसांकडे तक्रार दिल्याचा राग मनात ठेऊन..


सरपंचाने ड्रोनच्या सहाय्याने शेतात फवारणी केल्याने या शेतकऱ्याच्या सव्वा एकरातील भेंडी जळाली होती. याची शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांना तक्रार दिल्याचा राग मनात ठेवून सरपंचाच्या कुटुंबातील चौघांनी शेतकऱ्यावर तलवारीने हल्ला केला.


शेतकरी गंभीर जखमी


या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला शेतकरी अशोक मच्छिंद्र अस्वर यास उपचाराकरिता नगरच्या खाजगी दवाखान्यात नेण्यात आले. शेतकऱ्यात व सरपंचाचा कुटुंबात पूर्वीपासून शेतीविषयक वाद असल्याचे समोर येत आहे.उहल्ला करण्यात आलेले कुटुंब भावकीतील शेती बटाईने करतात. सरपंचाच्या जमिनीच्या जवळच त्यांची जमीन आहे. सरपंचांनी ड्रोनने त्यांच्या पिकांवर फवारणी केल्याने शेतकऱ्याच्या सव्वा एकर जमिनीवर लावलेली भेंडी जळाली.


घटनेने गावात खळबळ, सीसीटीव्हीत घटना कैद


सकाळी शेतात पाहणी करण्यासाठी गेला असता नुकसान भरून देण्यास सरपंचांनी टाळाटाळ करत शेतकऱ्यास शिवीगाळही केली होती. त्यानंतर शेतकऱ्याने आष्टी पोलीस ठाण्यात सरपंचाच्या विरोधात तक्रार दिली.याचाच राग मनात ठेवून सरपंचाच्या कुटुंबातील चार जणांनी हा हल्ला केला असल्याचे सांगण्यात येत आहे. शुक्रवारी सकाळी घडलेल्या या घटनेने गावात खळबळ उडाली असून ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. शुक्रवारी सकाळी घडलेल्या या घटनेत शेतकऱ्याच्या मागे चार जण तलवार घेऊन पळाल्याचे यात दिसत आहे.


हेही वाचा:


Nashik Crime : जुन्या भांडणाची कुरापत काढून पती-पत्नीने काढला युवकाचा काटा, नाशिकमधील धक्कादायक प्रकाराने खळबळ


राज्यात पुन्हा गँगचा धुमाकूळ! नवी मुंबईत चड्डी बनियान, डोंबिवलीमध्ये तलवार तर पुण्यात कोयता गँगचा उच्छाद


Sex Racket : शहरातील पॉश भागात 'स्पा' च्या आड देहव्यापार; 3 पीडित महिलांची सुटका तर दोन महिलेला अटक