Nashik Crime News नाशिक : गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात गुन्हेगारीच्या (Crime) घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आई. आता जुन्या भांडणाची कुरापत काढत एका तरुणाची हत्या केल्याची घटना पेठ (Peth) तालुक्यातील कोपुर्ली खुर्द (Kopurli Khurd) येथे घडली आहे. यामुळे पेठमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. भारत धनराज गवळी (28) असे मयताचे नाव आहे. 


याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी मधुकर गंगाराम भुसारे (Madhukar Bhusare) व त्याची पत्नी मंगलाबाई मधुकर भुसारे (Mangalabai Bhusare) हे पेठ तालुक्यातील कापुर्णे येथील येथील रहिवासी आहे. भारत धनराज गवळी (Bharat Gawli) हा त्याची सासुरवाडी असलेल्या कोपुर्ली खुर्द येथ राहत होता. कोपुर्ली खुर्द येथील मारूती मंदिराजवळ भारत गवळी व मधुकर भुसारे यांच्यात जुन्या भांडणावरून शाब्दिक वादावादी झाली. 


तरुणावर धारदार शस्त्राने सपासप वार


त्यानंतर भारत गवळी यास मधुकरची पत्नी मंगलाबाई हिने पाठीमागून धरून ठेवले तर मधुकर भुसारे याने त्याच्या हातात असलेल्या धारदार शस्त्राने भारत याच्यावर सपासप वार केले. या हल्ल्यात भारत हा गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडक यांनी घटनास्थळी भेट देत आरोपींना चोवीस तासाच्या आत शिताफीने जेरबंद केले आहे. तर परिसरात खुनाच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पती-पत्नीविरोधात पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वसंत पथवे पोलीस उपनिरीक्षक कैलास दरगुडे पोलीस हवालदार रविंद्र तांदळे करत आहेत.


गुन्हेगारी रोखण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान


दरम्यान, नाशिक शहरासह जिल्ह्यात खूनासह इतर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अनेकदा दिवसाढवळ्या देखील गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. विशेष म्हणजे गुन्हेगारीत अल्पवयीन युवकांचाही सक्रीय सहभाग आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी सराईत गुन्हेगारांवर वचक निर्माण करणे गरजेचे आहे. वाढती गुन्हेगारी रोखणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


पनीर खरेदी करताना सावधान! 'एफडीए'कडून तब्बल 314 किलो बनावट पनीर जप्त, नाशिकमध्ये मोठी कारवाई


Nashik Dengue Update : नाशिककरांनो काळजी घ्या! शहरात 365 जणांना डेंग्यूचा डंख, दहा दिवसातील आकडेवारीने चिंता वाढवली