Vastu Tips : प्रत्येक व्यक्तीला त्याचं घर नीटनेटकं ठेवायला आवडतं. आपलं घर एकदम परफेक्ट असावं, असं प्रत्येकाला वाटतं. वास्तूशास्त्रामध्ये घर कसं असावं आणि घरातील प्रत्येक दिशा आणि जागेचं महत्त्व सांगितलं आहे. वास्तूशास्त्रात सांगितल्याप्रमाणे, घरी जेवण करताना कोणत्या नियमांचं पालन करावं, याविषयीही माहिती दिली आहे. आपण कोणत्या दिशेने जेवण करायला बसावं आणि कोणत्या दिशेने जेवण करायला बसू नये, याविषयी जाणून घेऊया.


जेवण करताना कोणत्या दिशेला बसावं?


वास्तूशास्त्रात सांगितल्याप्रमाणे, जेवण करायला उत्तर आणि पूर्व दिशेला बसावं. ही जेवणासाठी शुभ दिशा मानली जाते, तर दक्षिण दिशा खूप अशुभ मानली जाते. शास्त्रानुसार, दक्षिण दिशेला जेवण करायला बसू नये, नाहीतर अनेक अडचणी वाढू शकतात.


कोणत्या दिशेने जेवायला बसू नये?


जेवण करताना पश्चिम दिशेला कधीच बसू नये. वास्तूशास्त्रानुसार, या दिशेला जेवण करायला बसल्यामुळे कर्ज वाढतात. त्यामुळे या दिशेला तोंड करुन कधीच बसू नये नाहीतर आर्थिक अडचणी वाढू शकतात, असं मानलं जातं.


जेवताना या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी



  • अंथरुणावर बसून कधीही जेवू नये. वास्तुशास्त्रानुसार हे चुकीचे आहे. असे केल्याने नकारात्मकता वाढते.

  • वास्तूनुसार जेवणाचे ताट कधीही थेट जमिनीवर ठेवू नये, तसेच थेट जमिनीवर बसून जेवू नये. नेहमी आसनावर किंवा पाटावर बसूनच जेवावे. 

  • वाढलेले ताट दुसऱ्याला देतांना ते दोन्ही हाताने पकडावे. यामुळे इतरांसोबतचे नाते घट्ट होते. परस्परांबद्दल प्रेम वाढते.

  • वास्तुनूसार, तुटलेल्या किंवा घाणेरड्या भांड्यांमध्ये जेवू नये, यामुळे घरात दारिद्र्य वाढते. यासोबतच जीवनात अडचणींचा सामना करावा लागतो.

  • जेवताना भांडण आणि वाद-विवाद करू नये. यामुळे अन्नदोष लागतो. जेवलेले अन्न अंगी लागत नाही. तसेच यामुळे अन्नपूर्णा देवी रूष्ठ होते. वास्तूदोष निर्माण

  • झाल्याने अनेक समस्या निर्माण होतात.

  • आंघोळ न करता कधीही जेवण करू नये. यामुळे नकारात्मकता वाढते.  आळस वाढतो आणि आजारांना आमंत्रण मिळते.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  


हेही वाचा :


Vastu Tips : घड्याळ, झाडू आणि... तुमच्या 'या' 5 वस्तू चुकूनही कोणाशी शेअर करू नका; पालटेल जीवनचक्र, लक्ष्मी होईल दूर