बीड: जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरामध्ये भर दिवसा मोंढा परिसरामध्ये एका तरुणाची हत्या (Murder) करण्यात आली आहे. काठीने मारहाण करत पाच जणांनी या तरुणाचा निर्घुणपणे खून केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यामध्ये खून करणाऱ्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे मारहाण करणारे पाचही आरोपी मयत तरुणाचे मामा आहेत. राजेंद्र श्रीराम कळसे (वय 37 वर्ष, रा. महसूल कॉलनी, अंबाजोगाई) असे मयताचे नाव आहे. तर, राम माणिकराव लाड, लक्ष्मण माणिकराव लाड, भारत माणिकराव लाड, बजरंग माणिकराव लाड, शत्रुघ्न माणिकराव लाड असे आरोपींचे नावं आहेत.
राजेंद्र कळसे हा अंबाजोगाई शहरातील पाटबंधारे विभागाच्या मांजरा कॉलनीमध्ये राहत होता. राजेंद्र कळसे आणि त्यांचे पाच मामा यांच्यामध्ये जागेवरून बऱ्याच दिवसांपासून वाद सुरु होता. याच जागेवरून त्यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली. याचाच राग मनात धरून पाचही मामांनी राजेंद्र कळस हा मोंढा परिसरात उभा असताना, त्याला काठ्यांनी जबर मारहाण केली. यामध्ये गंभीर जखमी झालेला राजेंद्र जागेवरच कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला.
पोलिसांत गुन्हा दाखल...
या प्रकरणानंतर आशा कळसे यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यामध्ये राजेंद्र कळसे याचे मामा माणिकराव लाड, लक्ष्मण लाड, भरत लाड, बजरंग लाड आणि शत्रुघ्न लाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, अंबाजोगाई शहरामध्ये भर दिवसा झालेल्या या खुनाच्या घटनेमुळे काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झाले होते.
रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडला होता
राजेंद्र कळसे आणि त्याच्या मामांमध्ये मागील काही दिवसांपासून जागेच्या एका जागेवरून वाद सुरु होता. याचाच राग पाचही मामांच्या मनात होता. त्यामुळे राजेंद्र कळसे मोंढा परिसरात उभा असताना पाचही मामा त्याच्याकडे पोहचले. आगोदर त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर या पाच मामांनी एकत्रित येऊन दगडाने ठेचून व काठ्यांनी मारहाण करून राजेंद्र यांचे डोके फोडले. याच मारहाणीत राजेंद्र जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडला होता. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या काही लोकांनी उपचारासाठी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दखल केले. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला तपासून मयत घोषित केले.
आष्टीमध्येही चाकूने भोकसून एकाचा खून
बीडच्या आष्टीमध्ये देखील सात वर्षाच्या गुन्ह्यांमध्ये दुसरे आरोपीचे नाव घेतल्याने हैवान काळे याचा सहा जणांनी मारहाण करून चाकूने भोकसून खून केला आहे. हैवान काळे हा आष्टी तालुक्यातील चिखली येथील रहिवासी असून, सात वर्षांपूर्वी घडलेल्या एका गुन्ह्यांमध्ये त्याने सहा लोकांची नावे सांगितली होती. त्याच्याच रागातून सहा जणांनी हैवान काळेचा चाकूने वार करून खून केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: