श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या रेसाई जिल्ह्यात एक बस दरीत कोसळून झालेल्या अपघातामध्ये नऊ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या दुर्घटनेत 33 प्रवाशी जखमी झाल्याची माहिती आहे. या बसवर दहशतवाद्यांनी (terrorist attack) हल्ला केल्यामुळे ही बस दरीत कोसळल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, या बसवर दहशतवाद्यांकडून गोळीबार (Firing on bus) करण्यात आला. त्यानंतर ही बस दरीत जाऊन कोसळली. बसमधील किती प्रवाशांचा गोळ्या लागून मृत्यू झाला आहे, याबाबत अद्याप नेमकी माहिती समोर आलेली नाही. 


ही बस भाविकांना घेऊन शिवखोडी मंदिराच्या दिशेने जात होती. ही बस दरीत जोरात आदळल्याने आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळावरुन बंदुकीतील गोळीच्या रिकाम्या पुंगळ्या सापडल्या आहेत. या दुर्घटनेनंतर स्थानिकांनी मदतीला धावून येत बसमधून जखमींना बाहेर काढले आणि रस्त्यापर्यंत उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेपर्यंत नेले. 






प्राथमिक माहितीनुसार, ही बस कटरा शहरातील शंकराचे देऊळ असलेल्या शिव खोरी इकडे जात होती. ही बस रस्त्यावरुन जाताना दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्यामुळे बस रस्त्यालगत असलेल्या अरुंद घळीत जाऊन कोसळली. हा परिसर रेसाई आणि राजौरी जिल्ह्याच्या सीमेवर आहे. या परिसरात यापूर्वी दहशतवाद्यांचा वावर दिसून आला आहे. या दुर्घटनेनंतर पोलीस आणि सुरक्षा दलांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले आहे. तसेच दहशतवाद्यांना शोधण्यासाठी सुरक्षा दलांनी शोधमोहीम सुरु केली आहे. 


आणखी वाचा


टी-20 विश्वचषकादरम्यान दहशतवादी हल्ला करण्याची धमकी; पाकिस्तानमधून फोन आल्याची माहिती, CWI ने सुरक्षेचे दिले आश्वासन