बारामती : सख्ख्या मावसभावाने भावावर कात्रीने तब्बल 38 वार करून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आज दुपारी साडेबारा वाजता बारामतीतील रुई शासकीय रुग्णालयाच्या पाठीमागे ही घटना घडली. गजानन पवार (वय 28) असे हत्या झालेल्या तरूणाचे नाव आहे. तर संतोष गुळमूळे असे हत्या करणाऱ्या संशयिताचे नाव आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गजानन याचा मुलगा दुपाली शाळेतून घरी आला. यावेळी वडिलांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेले त्याने पाहिले. त्यामुळे याबाबत त्याने शेजाऱ्यांना सांगितले. शेजाऱ्यांनी घडल्या प्रकाराबाबत बारामती तालुका पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच तत्काळ पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. परंतु, तोपर्यंत गजान याचा मृत्यू झाला होता. 


मृत गजानन हा मूळचा हिंगोलीचा असून तो बारामतीत एका केशकर्तनालयाच्या दुकानात काम करत होता. त्याच्याबरोबरच त्याचा मावसभाऊ संतोष गुळमूळे हा देखील काम करतो. मात्र, संतोष हा सतत दारुच्या नशेत असतो अशी माहिती पोलिसांना मिळाली. यातूनच त्याने ही हत्या केल्याचा पोलिसांचा संशय आहे. 


सीसीटिव्ही फुटेजमध्ये संतोष येथून जाताना पोलिसांना दिसले. त्यामुले पोलिसांनी संतोष याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता तो पळून जाण्याच्या तयारीत कटफळ रेल्वे स्थानकावर रेल्वेची वाट पाहत होता. कटफळ रेल्वे स्थानकावरूनच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.  


संतोष याच्याकडे पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली. वारंवार नशेत राहण्याबद्दल विचारणा केल्याने आपण त्याला मारणार असे संतोष सतत म्हणत होता अशी माहिती गजानन याच्या पत्नीने पोलिसांना दिली. त्यावरून पोलिसांनी अधिक तपास केला असता संतोष याने सख्ख्या मावसभावाचा केवळ राग म्हणून खून केला व तो अतिशय निर्घृण पध्दतीने केल्याचे उघड आले. पोलिसांनी आरोपी संतोष याला ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.


महत्वाच्या बातम्या


Job Fraud : सरकारी कार्यालयात 'सेटिंग' असल्याची बतावणी, नोकरीच्या नावावर 14 लाखांचा चुना 


न्यायाधीशांची फसवणूक करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला बेड्या, यवतमाळ पोलिसांची कारवाई