Shyam Manav security increased in Nagpur : बागेश्वर धामचे महाराज पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना दिव्यशक्ती दाखविण्याचे चॅलेंज देणारे अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे सहअध्यक्ष श्याम मानव यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्यांना अज्ञात व्यक्तीने धमकी दिल्याचे समोर आले आहे.


अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष श्याम मानव यांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आलेली आहे. बागेश्वर धामचे मुख्य पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Bageshwar Baba) आणि श्याम मानव यांच्यातील वाद हा दिवसेंदिवस पेटत आहे. त्यामुळे हिंदुत्ववादी संघटनांबरोबरच संतांनी देखील पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या पाठीशी उभे झाल्यामुळे श्याम मानव यांच्या जीवितास कुठलाही धोका उद्भवू नये, या पार्श्वभूमीवर श्याम मानव यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलेली आहे.


नागपुरात मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील बागेश्वर धामचे महाराज पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. त्यात त्यांनी दिव्यशक्तीद्वारे विविध चमत्कार दाखवल्याचा दावा करण्यात आला होता. त्यावर श्याम मानव यांनी धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना तुम्ही आम्हाला दिव्यशक्तीचे चमत्कार दाखवा आणि '30 लाख रुपय घेऊन जा' असा खुले आव्हान दिले होते. त्यात आता विविध संघटनांनी उडी घेतली असून श्याम मानव हिंदू धर्माची बदनामी करत असल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केला आहे.  श्याम मानव यांना धमक्या देण्याचे सत्र सुरु झाले असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. 


खुलं आव्हान दिलं अन् वाद पेटला


तुमच्याकडे दिव्यशक्ती असेल तर तुम्ही नागपूरला या, रायपूरला बोलवून भक्तांच्या आड कशाला लपता, धमक असेल तर नागपुरात येऊन तुमची शक्ती सिद्ध करा असे आव्हान बागेश्वर बाबांना श्याम मानव यांनी दिला होते. बागेश्वर बाबांनी आव्हान स्वीकारलं हेच मुळात खोटं आहे. मी त्यांना चॅलेंजबद्दल स्पष्टपणे कळवलं आहे. मुळात भक्तांसमोर या कसोट्या करणे शक्य नाही. याबद्दल त्यांच्या व्हिडीओमध्येच अनेक गोष्टी स्पष्ट दिसून येतात. बाबांकडे दिव्यशक्ती असल्याचे सिद्ध झाल्यास ती सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. मात्र वैज्ञानिक कसोटीतून त्यांनी ते करावं, आपली एवढीच मागणी असल्याचे ते म्हणाले.


...म्हणून नागपुरात दिलं चॅलेंज


बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र महाराजांनी नागपुरात येऊन दिव्यशक्ती असल्याचे सांगितले. भक्तांसमोर विविध चमत्कार दाखवल्याचा दावा केला. तसेच एखाद्या अनोळखी व्यक्तीबद्दल सर्व माहिती चेहरा बघून सांगितल्याचा दावा केला. कोणाच्या घरी काय ठेवले आहे, कुठे ठेवले आहे, हेही सांगितले. त्यामुळे त्यांना नागपुरात येऊन 'दिव्यशक्ती' सिद्ध करण्याचे चॅलेंज दिल्याचे ते म्हणाले.


ही बातमी देखील वाचा...


Maharashtra News: BIS चे नागपूरसह, मुंबई, पुणे व ठाण्यात छापे; एक कोटींचे दागिने जप्त