Baba Siddique Murder Case : महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचा तपास सुरू आहे. याप्रकरणी पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक केली आहे. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाच्या तपासासाठी मुंबई गुन्हे शाखेचे एक पथक नागपुरात पाठवण्यात आले होते, तेथून पोलिसांनी 26 वर्षीय सुमित दिनकर वाघ याला अटक केली आहे.
सुमित दिनकर वाघ हा महाराष्ट्रातील अकोला येथील रहिवासी आहे. अटकेनंतर आरोपीला मुंबईत आणण्यात येत आहे. बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपी रुपेश मोहोळ, गुरनैल सिंह आणि हरीश कुमार यांना सुमितने पैसे ट्रान्सफर केले होते, असे सांगण्यात येत आहे. त्याने कर्नाटक बँकेचे खाते (पेटलाड शाखा, आणंद, गुजरात) वापरून हे पैसे पाठवले होते.त्याचवेळी अटक आरोपी सलमान व्होरा याच्या नावे नवीन खरेदी केलेले सिमकार्ड वापरून त्याने इंटरनेट बँकिंगद्वारे पैशांचा व्यवहार केला होता. या प्रकरणात सुमित हा फरार आरोपी शुभम लोणकरच्या सूचनेनुसार काम करत होता आणि सुमितने शुभमच्या सांगण्यावरूनच पैसे ट्रान्सफर केले होते. आरोपी शुभम लोणकर आणि सुमित हे मित्र असून दोघेही अकोला जिल्ह्यातील अकोट शहरातील एकाच महाविद्यालयात शिकत होते.
यापूर्वी बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात आकाशदीप नावाच्या आरोपीला पंजाबमधील फाजिल्का येथून अटक करण्यात आली होती. अटक आरोपी आकाशदीप गिलने अनेक महत्त्वाचे खुलासे केले आहेत. मुंबई क्राइम ब्रँचच्या चौकशीदरम्यान गिलने बाबा सिद्दीकी हत्याकांडातील गँगस्टर लॉरेन्सचा भाऊ अनमोल बिश्नोई याच्या थेट संपर्कात असल्याचे उघड केले. बाबा सिद्दीकी यांची १२ ऑक्टोबर रोजी हत्या झाली होती
महाराष्ट्राचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबर रोजी वांद्रे येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. राष्ट्रवादीचे नेते त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाजवळ उपस्थित असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्याच्या हत्येची जबाबदारी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीने घेतली होती. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत अनेकांना अटक केली आहे.
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने नागपूरातून एका 26 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव सुमित दिनकर वाघ असे आहे. तो मूळ अकोला जिल्ह्यातील पणज गावातील रहिवासी आहेय. त्याच्यावर आरोपींना पैसे पोहोचवल्याचा आरोप आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना मुंबईत नेल्या जात आहे..सुमित वाघ हा गेल्या सात ते आठ महिन्यापासून नागपूर येथे राहात होता. पणज गावात त्याचे आई आणि आजी राहते.. मागील सात महिन्यापासून जवळपास तो नागपूरला राहत आहे..दरम्यान, सुमित हा इंटरनेट सेवा तसेच मोबाईल हाताळण्यात एक्सपर्ट असल्याचे समजते.. त्यामुळे बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात सुमितची आणखी काय भूमिका होती? हे तपासात उघड होणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या