Jasprit Bumrah Record Steve Smith पर्थ: जसप्रीत बुमराहनं पर्थ मध्ये सुरु असलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी दमदार कामगिरी केली आहे. जसप्रीत बुमराहनं टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाला पहिल्या डावात केवळ 150 धावा करता आल्या. यानंतर फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियाला टीम इंडियाच्या गोलंदाजांनी दणका दिला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियानं 7 बाद 67 धावा केल्या होत्या. जसप्रीत बुमराहनं दमदार गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला सुरुवातीला धक्के दिले. त्याला हर्षित राणा आणि मोहम्मद सिराजनं साथ दिल्यानं ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्याच दिवशी बॅकफूटवर गेल्याचं पाहायला मिळालं.
ऑस्ट्रेलियानं पहिल्या दिवशी 7 विकेट गमावल्या यातील चार विकेट जसप्रीत बुमराहनं घेतल्या. बुमराहनं ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टीव्ह स्मिथला शुन्यावर बाद केलं. यापूर्वी डेल स्टेननं स्टीव स्मिथला शुन्यावर बाद केलं होतं. या मध्ये जसप्रीत बुमराहच्या नावाचा समावेश झाला आहे. ऑस्ट्रेलियात गोल्डन डक होण्याची स्टीव स्मिथची पहिली वेळ आहे. डेल स्टेन आणि जसप्रीत बुमराहनं स्टीव स्मिथला एलबीडब्ल्यू बाद केलं.
ऑस्ट्रेलियाला सुरुवातीला तीन धक्के
जसप्रीत बुमराहनं ऑस्ट्रेलियाला सुरुवातीलाच दोन धक्के दिले त्यामुळं ऑस्ट्रेलिया बॅकफुटवर गेल्याचं पाहायला मिळालं. उस्मान ख्वाजाला बाद केल्यानंतर दुसऱ्या बॉलवर स्टीव स्मिथला गोल्डन डकवर पॅवेलियनमध्ये पाठवलं.
जसप्रीत बुमराहला सिराज अन् हर्षित राणाची साथ
रोहित शर्माच्या गैरहजेरीत जसप्रीत बुमराहकडे टीम इंडियाचं नेतृत्त्व देण्यात आलं आहे. जसप्रीत बुमराहनं टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीपुढं भारताचे फलंदाज 150 धावा करु शकले. यानंतर फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियाला भारताच्या वेगवान गोलंदाजांनी धक्के दिले. जसप्रीत बुमराहनं चार, मोहम्मद सिराजनं 2 आणि हर्षित राणानं एक विकेट घेतली. जसप्रीत बुमराहनं उस्मान ख्वाजा, स्टीव स्मिथ, नाथन मॅकस्वीनी आणि पॅट कमिन्सची विकेट घेतली.
फलंदाज अपयशी पण गोलंदाजांनी सावरलं
जसप्रीत बुमराहनं टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, टीम इंडियाचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल शुन्यावर बाद झाला. नितीशकुमार रेड्डी, रिषभ पंत आणि केएल राहुल, ध्रुव जुरेल वगळता इतर फलंदाजांना दोन अंकी धावसंख्या देखील गाठता आली नाही. नितीशकुमार रेड्डी आणि रिषभ पंत यांच्या भागिदारीमुळं भारतीय संघाला 150 धावांपर्यंत पोहोचता आलं. गोलंदाजांनी दमदार कामगिरी करत ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर ढकललं आहे. मात्र, दुसऱ्या डावात टीम इंडियाच्या फलंदाजांना दमदार कामगिरी करावी लागेल.
इतर बातम्या :