Aurangabad Crime News: असं म्हणतात प्रेम आंधळं असतं, प्रेमासाठी माणूस कोणत्याही थरायला जायला तयार असतो. आता असंच काही औरंगाबादमध्ये (Aurangabad Crime) पाहायला मिळाले. कारण गर्लफ्रेंडचे हट्ट पुरवण्यासाठी तिघांनी चक्क मोटारसायकल चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. औरंगाबाद शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने या तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. 


गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद (Aurangabad News) शहरात मोटरसायकल चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे पोलिसांकडून अशा मोटरसायकल चोरांचा शोध घेतला जात आहे. दरम्यान नारायण रामराव भंडारे (वय 21 वर्ष रा. राजणगांव शे.पु. ता. गंगापूर जि. औरंगाबाद),  कृष्णा ज्ञानोबा होळकर (वय 24 वर्ष, रा. राजणगांव शे.पु. ता. गंगापूर जि. औरंगाबाद) आणि अर्जुन मधुकर वाकळे (वय 24 वर्ष, रा. राजणगांव शे.पु. ता. गंगापूर जि. औरंगाबाद) यांनी औरंगाबाद शासकीय घाटी रुग्णालय परिसर आणि वाळुज एमआयडीसी परिसरातून मोटरसायकल चोरी केली असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती.


गर्लफ्रेंडचे हट्ट पुरविण्यासाठी मोटारसायकलची चोरी...


तर वरील तिघांनी मोटरसायकल चोरी करून चोरी करुन केलेल्या काही मोटारसायकल त्यांच्या राहत्या घरी ठेवल्याची खात्रीलायक बातमी मिळाल्याने, गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक गजानन सोनटक्के यांनी आपल्या पथकासह त्यांच्यावर घरावर छापा टाकला. पोलिसांनी तिघांच्या घरी छापा टाकून त्यांना ताब्यात घेऊन चोरीच्या मोटारसायकलबाबत विचारपुस केली असता त्यांनी मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली. सोबतच गर्लफ्रेंडचे शोक पुरविण्यासाठी दारुच्या नशेत आपण या मोटारसायकल चोरी केल्याच देखील त्यांनी सांगितले. तर पोलीसांनी तिघांच्या ताब्यातून विक्री केल्या व स्वतः वापरत असलेल्या अशा एकुण 8 लाख 90 हजार  रुपये किमंतीच्या 11 विविध कंपन्याच्या मोटारसायकल जप्त केल्या आहेत.


'या' भागातून चोरी...


वरील आरोपींनी घाटी दवाखाना, पैठण गेट, एम. आय. डी. सी. वाळुज परिसरातुन विविध कंपनीच्या मोटार सायकल चोरी करुन विकल्या आहेत. तर पोलिसांनी चोरीच्या मोटारसायकल बाबतचा गुन्हे अभिलेख तपासला असता पो.स्टे एम. वाळुज, बेगमपुरा पोलीस स्टेशन अणि पोलीस स्टेशन लिमगांव नांदेड येथे दाखल एकुण 11 गुन्हे उघडकीस आणले आहे. तर ताब्यात घेण्यात आलेल्या तिन्ही चोरट्यांना पुढील तपासासाठी मुददेमालासह क्रांती चौक, वाळूज पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.


यांनी केली कारवाई...


ही कारवाई औरंगाबाद शहर पोलीस दलाचे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गजानन सोनटक्के, सफौ.विठठल जवखेडे, पोह. दत्तात्रय गडेकर, ज्ञानेश्वर पवार, परभत म्हस्के, पो.अंमलदार संदीप बीडकर, विजय भानुसे, नितीन देशमुख, तात्याराव शिनगारे, अजय चौधरी, संदीप पाटील यांनी केली आहे.