Latur Viral Video : लग्नकार्य म्हटलं की मित्र परिवाराच्या जल्लोष हा टिपेला पोहचलेला असतो. अशातच हळदीवेळी नुसता कल्ला असतो. यातच नाच गाणं आलंच, मात्र हेही एका सीमेपर्यंत ठीक आहे. एका हळदीच्या कार्यक्रमात चक्क तलवारी-कोयते घेऊन डान्स केल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत काही तरुण हातात कोयते आणि तलवारी घेऊन नाचत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नवरदेवासह त्याचे मित्र फरार झाले असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडीओ लातूर येथील आहे. लातूर शहरातील एलआयसी कॉलनी भागात शुभम तुमकुटे यांचे लग्न असल्यामुळे हळदीच्या कायर्कम ठेवण्यात आला होता. याच कार्यक्रमाला त्याचे सात ते आठ मित्र आले होते. हळदीचा कार्यक्रम असल्याने ही सर्वच मंडळी रंगात असल्याचे या व्हिडीओत दिसत आहे. या व्हिडीओत दिसत असल्याप्रमाणे या सर्व तरुणांनी हातात कोयता आणि तलवारी घेत 'मै हु डॉन' या गाण्यावर ठेका धरला होता. हा सर्व गोंधळ सार्वजनिक ठिकाणी दीड तास सुरू होता, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर याची माहिती लातूरच्या विवेकानंद पोलिसांना मिळाली. पोलिसांनी व्हिडीओ दिसत असलेल्या तरुणाचा तात्काळ शोध सुरू केला. मात्र पोलिसांच्या हाती लागण्याआधीच 'मै हु डॉन' या गाण्यावर ठेका धरणारा नवरदेव फरार झाला आहे. मात्र त्याच्या मित्रांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस फरार नवदेव शुभम तुमकुटे याचा शोध घेत आहेत.
हेही वाचा :
- Nitesh Rane on Shiv sena : महाराष्ट्राच्या प्रधान सेवकानं जनतेला भेटलेलं आम्हालाही पाहायचंय; नितेश राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीका
- राणेंच्या बंगल्यावर कारवाई होणार? पाहणीसाठी पालिकेचं पथक रवाना, अधिकारी काय पाहणी करणार?
- Rajesh Tope : आरोग्य विभागाच्या परीक्षा नव्या पद्धतीने होणार, आरोग्यमंत्र्यांची महत्वपूर्ण माहिती
- Latur : पहिली ते चौथीच्या शाळा सुरू, तब्बल 2 वर्षांनंतर वाजली शाळेची घंटा