Buldhana Crime News: बुलढाणा जिल्ह्यातून चोरीची एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी व मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेल्या समर्थ रामदास स्वामी (Samarth Ramdas Swami) स्थापित वारी हनुमान मंदिरात धाडसी दरोडा (Crime News) पडल्याची घटना घडली आहे. यात दरोडेखोरांनी हनुमानाचे दागिने लांबविले असल्याची घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे यात अज्ञात दरोडेखोरांनी पुजाऱ्याला बांधून हनुमान मूर्तीवरील आभूषणे लुटली आहेत. जवळपास साडे पाच किलो चांदीचे दागिने आणि दान पेटीतील एक लाख रुपये घेऊन दरोडेखोर पोबारा झाले आहे. घटनेची माहिती मिळताच सोनाळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. 


पुजाऱ्याला बांधून मूर्तीवरील आभूषणे लुटली


पुढे आलेल्या माहितीनुसार, सातपुड्याच्या पायथ्याशी हे पुरातन जागृत अस हनुमानाचे मंदिर आहे. या मंदीराबाबत भाविकांची मोठी श्रद्धाअसून अनेक राज्यातून भाविक याठिकाणी येत असतात. विशेष म्हणजे सातपुड्याच्या पायथ्याशी  आणि मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेल्या या मंदिरातील हनुमंताची मूर्ती समर्थ रामदास स्वामी यांनी स्थापित केले आहे. त्यामुळे भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या वारी हनुमान मंदिरात धाडसी दरोडा (Buldhana Crime News) पडल्याच्या घटणेने परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. 


एकाच बसचे दोनदा ब्रेक फेल; बसस्थानक चौकात थरार 


हिंगणघाट-माहूर ही बस प्रवासी घेऊन जात असताना वनवासी मारुती परिसरात बसचा अचानक ब्रेक फेल झाला. त्यानंतर चालकाने बस थांबून प्रवाशांना खाली उतरविले आणि थोडी दुरुस्ती करून बस चालकाने बसला टोचून न लावता डेपोमध्ये जाण्यासाठी निघाले. त्यावेळी धावत्या बसचे ब्रेक पुन्हा निकामी झाल्याने बसने थेट दुचाकीला धडक दिली आणि दुचाकीला सोमरच्या चाकात घेऊन फरकरट नेत  फुटपाटवर धडकली. ही घटना बसस्थानक चौकात घडली. यात दुचाकी स्वार साईडला कोसळला आणि दुचाकीला सोमरच्या चाकात घेऊन फरकरट नेत फुटपाटवर बस धडकली. दुचाकी स्वाराला गंभीर दुखापत झाली असून सुदैवाने यात कुठलीच जीवित हानी झाली नाही. मात्र या घटणेने परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या