Ram Kapoor On Rakhi Sawant: राखी सावंतचा (Rakhi Sawant) प्रसिद्ध शो 'राखी का स्वयंवर' होस्ट करणारा अभिनेता राम कपूरनं (Ram Kapoor) तिच्याबाबत काही धक्कादायक वक्तव्य केली आहे. त्यामुळे सध्या सगळीकडे खळबळ माजली आहे. अभिनेत्रीचं इंडस्ट्रीमध्ये कसं शोषण झालं? याबद्दल राम कपूरनं थेट आणि स्पष्ट वक्तव्य केलं आहे. तसेच, पुढे बोलताना राम कपूर म्हणाला की, आज राखीनं जे काही साध्य केलं आहे, ते तिनं स्वतःच्या बळावर साध्य केलं आहे.


"राखीकडे 3 BHK अपार्टमेंट आहे"


राम कपूरनं राखीचं कौतुकही केलं आहे. राखीच्या प्रत्येक गोष्टीशी सहमत नसलो तरी, तिच्या धाडसासाठी तिचा आदर करतो. सिद्धार्थ कननशी बोलताना राम कपूर म्हणाला की, "आज संपूर्ण देश राखी सावंतला ओळखतो. ती मुंबईत समुद्रासमोरच एका 3BHK अपार्टमेंटमध्ये राहतो, जिथे मी गेलो आहे आणि ती तिची स्वतःची बॉस आहे. तिनं ते स्वतः साध्य केलं आहे." 






राखीला इंडस्ट्रीत खूप वाईत अनुभव आलेत...


शोबिझमध्ये राखी सावंतचं कसं शोषण झालं? याकडे लक्ष वेधताना राम कपूर म्हणाला की, "एक चांगली, सेक्सी डान्सर, जिचा इंडस्ट्रीनं गैरवापर केला... तिला खूप वाईट अनुभव आले आहेत. तिला कोणीही गॉडफादर नव्हतं, काहीही नव्हतं. मी हे सर्व पाहिले कारण राखीचं स्वयंवर. तुम्ही प्रत्येक गोष्टीतून शिकता."


राम कपूरकडून राखीवर कौतुकाचा वर्षाव 


राखी सावंतचं कौतुक करताना राम कपूर म्हणाला की, "मी तिच्या वेडेपणाशी अजिबात सहमत नाही... पण ती जे काही करते, सत्य हे आहे की, तिनं स्वतःचे आयुष्य स्वतः घडवलं आहे आणि मी ते पाहिले आहे. तुम्ही त्याचा आदर कसा करू शकत नाही?"


ती म्हणाली होती की, "मी कोणाकडूनही मदत मागत नाहीये, ही माझी लढाई आहे. सलमान खान, फराह खान आणि शाहरुख खान मला एका सेकंदात जामीन मिळवून देऊ शकतात, पण मी कोणाकडूनही मदत मागत नाहीये. मी किती वेळ वाट पाहणार?" मदतीसाठी? मी भीक मागत राहीन, किती काळ भीक मागत राहणार? मी भिकारी झाली आहे. मला भारतीय कायद्यावर विश्वास आहे."


दरम्यान, राखीनं 2022 मध्ये पारंपारिक निकाह समारंभात आदिलशी लग्न केलं. 2023 मध्ये तिनं लैंगिक अत्याचार आणि फसवणूकीचा हवाला देत घटस्फोटासाठी अर्ज केला. आदिलनं आरोप फेटाळले आहेत, राखीनं पुढे बोलताना असा दावा केला की, आदिलनं दुबईमध्ये तिचे न्यूड व्हिडीओ लाखो रुपयांना विकले होते.