ठाणे :  अनैतिक संबंधातून अनेकदा गुन्हेगारीच्या घटना घडतात, त्यातून खून किंवा खूनाचा प्रयत्न यांसारखे गंभीर गुन्हेदेखील दाखल झाल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. आता, भिवंडी शहरातील पद्मानगर परीसरात घरात घुसून अश्लील चाळे व अत्याचाराचा प्रयत्न केल्याने एका महिलेकडून पुरुषाच्या गुप्तांगावर हल्ला केल्याची खळबळ जनक घटना समोर आली आहे . अनिल रच्चा( वय 31वर्ष) असे जखमी आरोपी प्रियकराचे नाव आहे. शहरातील पद्मा नगर परिसरात राहणाऱ्या एका 26 वर्षीय महिलेच्या घरात अचानक 31 वर्षीय अनिल रच्चा आला व महिलेसमोर अश्लील चाळे करत अत्याचाराचा प्रयत्न केला. यावेळी, महिलेने स्वतःच्या बचाव करताना स्वयंपाक घरातील उलातन्याने त्याच्या गुप्तांगावर घाव घालत हल्ला चढवला, त्यात तो गंभीर जखमी झाला आहे. आरोपीला शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. याबाबत पोलिसांनी दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकून घेतलं असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.


पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, या घटनेतील 31 वर्षीय महिला व आरोपी यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. परंतु त्या दिवशी महिलेच्या इच्छेविरुद्ध आरोपीने पीडीत महिलेसोबत अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याने घाबरलेल्या महिलेने त्याला प्रथम विरोध केला. तरीही, आरोपीने जबरदस्ती करत असल्याने महिलेने स्वयंपाक घरातील उलातन्याने आरोपीच्या गुप्तांगावर हल्ला करुन त्यास गंभीर जखमी केले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (crime news) केला असून आरोपीला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. पीडित महिला ही एका खासगी शाळेमध्ये मावशीचं काम करते, व पीडितेचा नवरा देखील शाळेतील बसवर वाहन चालकाचे काम करतो. महिलेने केलेल्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीने दिलेल्या जबाबानुसार संबंधित महिलेचे आपले अनेक वर्षांपासूनचे प्रेम संबंध होते, अनेकवेळा आमच्यामध्ये शारीरिक संबंध झाले आहेत. विशेष म्हणजे, त्या दिवशीसुद्धा तिनेच मला फोन करून बोलावले असल्याचे आरोपीने सांगितले. आमच्या दोघांमध्ये काही कारणास्तव भांडण झाल्याने ही घटना घडली असल्याचे त्याने सांगितल्याची माहिती भिवंडी शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव कुंभार यांनी दिली. दरम्यान, या प्रकरणात पोलीस अधिक तपास करत आहेत.


हेही वाचा 


मुख्यमंत्री गावाकडं निघाले, 160 हॉर्स पॉवरची खास शिवप्रताप सज्ज; नव्या बोटीची वैशिष्ट भारी 


जगदीश मुळीक, वळवळ थांबवून थोबाड बंद कर, अमोल मिटकरी यांचं प्रत्युत्तर!