गुवाहाटी : आसाममध्ये एक धक्कादायक घटना घडलीय. पाच लोकांनी एका मुलीचं लैंगिक शोषण केलं आहे. त्यामध्ये त्या मुलीला मारहाणही करण्यात येत आहे. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेवर आसाम पोलिसांनी एक ट्वीट करुन पाचही आरोपींचे फोटो जाहीर केले आहेत आणि त्यांचा शोध सुरु केला आहे. या पाच लोकांना शोधून देणाऱ्याला बक्षिसही जाहीर केलंय. पीडित मुलगी ही ईशान्य भारतातील आहे.
काय आहे प्रकरण?
एका मुलीचे चार पुरुष आणि एका महिलेकडून लैंगिक शोषण केलेल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये या पाच जणांकडून त्या मुलीला अत्यंत वाईट पद्धतीने वागवण्यात येत असून तिला मारहाण करण्यात येत आहे. त्या मुलीला अर्वाच्य शिवीगाळही करण्यात येत असून या घटनेचा लाईव्ह व्हिडीओही शेअर करण्यात येत आहे.
ही घटना आसाममधीलच आहे असं सांगण्यात येतय पण नेमकी कुठे घडली आणि कधी घडली याची माहिती नाही. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आसाम पोलिसांनी पाचही आरोपींचे फोटो सोशल मीडियावर जारी केले असून त्यांची माहिती देणाऱ्यास बक्षिसही जाहीर केलं आहे. या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया येत असून आरोपींना गोळ्या घालाव्यात, त्यांना फाशी देण्यात यावी अशी मागणी सोशल मीडियातून केली जात आहे.
आसाम पोलिसांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय की, "हे त्या पाच आरोपींचे फोटो आहे जे व्हायरल व्हिडीओमध्ये त्या मुलीचे लैंगिक शोषण करत आहेत. ही घटना नेमकी कुठली आणि कधी घडलीय हे माहित नाही. ज्या कोणाकडे याची माहिती असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा."
आसाम पोलिसांनी या पाचही आरोपींना शोधण्यासाठी एक ऑपरेशन सुरु केलं असून लवकरच आरोपींना अटक करु असा विश्वासही व्यक्त केला आहे.
काही जणांनी हा व्हिडीओ राजस्थानमधील जोधपूरचा असल्याचं सांगितलं होतं. पण केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी त्याची खातरजमा केली आणि तो जोधपूरचा नाही असं स्पष्ट केलं. पण आरोपी कुठलेही असोत, त्यांना शिक्षा करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या :
- Coronavirus india : भारतात कोरोनाची दुसरी लाट ओसरण्यास सुरुवात; जाणून घ्या केव्हापर्यंत राहील अशीच परिस्थिती
- Corona Vaccination : मुंबई महापालिकेच्या लसींच्या ग्लोबल टेंडर प्रक्रियेतून पुरवठादाराची माघार; पालिकेच्या अडचणीत भर
- संभाजीराजेंची आज पत्रकार परिषद, मराठा आरक्षण प्रश्नी कोणती भूमिका मांडणार?