ठाणे : सोसायटीच्या आवारात अश्लील भाषेत शिवीगाळ करणाऱ्या महिलेला आणि सेक्रेटरीला समजावण्यासाठी गेलेल्या एका तरूण वकिलाला बेदम मारहाण झाल्याची घटना अंबरनाथमध्ये (Ambernath Crime) घडली आहे. सोसायटीचा वाद सुरू असतानाची ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे (Ambernath Police) दाखल झाला आहे.
  
अंबरनाथ पूर्व मीरा आवलॉन या उचभ्रू सोसायटीमधला वाद विकोपाला गेला असून यासंदर्भात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivajinagar Police Station) गुन्हा दाखल झाला आहे. सविस्तर घटना अशी आहे की, अंबरनाथ पूर्व प्राचीन शिवमंदिराच्या मागे मीरा आवलॉन नावाची सोसायटी आहे. या सोसायटीत राहणारे अमरीत सिंह हे वकील आहेत. ते रात्रीचे जेवण करून सोसायटी आवारात फिरत असताना सोसायटीचे सेक्रेटरी श्याम छाब्रिया आणि सोसायटीमध्ये राहणाऱ्या उषा मुरजानी नामक महिला यांच्यात वाद सुरू होता.


वाद सोडवण्यासाठी मध्ये पडले आणि मारहाण झाली 


सेक्रेटरी श्याम छाब्रिया यांना उषा मुरजानी या शिवीगाळ करत होत्या. त्यांच्यातला हा वाद सोसायटी आवारात सुरू होता. हा वाद पाहून अमरीत सिंग यांनी सोसायटी सेक्रेटरी आणि त्या महिलेला समजवण्याचा प्रयत्न करत बाजूला घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी उषा मुरजानी यांनी अमरीत सिंह यांना 'तू मध्ये का येतो' अस म्हणत अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यावेळी अमरीत सिंह यांनी शिवीगाळ करण्याचं कारण विचारलं असता त्या महिलेने पुन्हा शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. तसेच आक्षेपार्ह शिवीगाळ करत जातीवाचक अपशब्द बोलल्याचे आरोप अमरीत सिंग यांनी केले आहे.


अंबरनाथमधील सोसायटीमध्ये झालेल्या या मारहाणीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून यासंदर्भात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी दोन्ही बाजूंनी तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस त्यावर अधिकचा तपास करत आहेत. 


फुकटचा वडापाव दिला नाही म्हणून मारहाण


अंबरनाथमध्ये गावगुंडांचा हैदोस सुरूच असून अशीच एक घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. वडापाव फुकट दिला नाही म्हणून हॉटेल चालकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या प्रकरणी आरोपी आकाश विरोधात अंबरनाथ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 


ही बातमी वाचा: 


Ambernath Crime : बसण्याच्या जागेवरून वाद अन् धारधार चाकूने कानच कापला, अंबरनाथमध्ये गावगुंडांचा हौदोस सुरू