ठाणे : किरकोळ कारणास्तव वाद झाल्यानंतर तिघा जणांनी धारदार चाकूने तरूणाचा कान कापल्याची धक्कादायक घटना अंबरनाथमध्ये (Ambernath Crime) घडली आली आहे. बसण्याच्या जागेवरून वाद घालत या टोळक्याने तरूणावर जीवघेणा हल्ला केला. या हाणामारीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. मात्र अद्यापही शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला नाही. या घटनेनंतर परिसरात दहशतीचे वातावरण पसरलं आहे.


अंबरनाथ पूर्व बिकेबिन रोडवर  किरकोळ कारणास्तव वाद घालत तरूणावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जखमी तरूणाचं नाव नीरज सिंग असून नीरज पेंटरचा काम करतो. चहा पिण्यासाठी तो टपरीवर बसला होता. मात्र त्या ठिकाणी गावगुंड जमा झाले आणि बसण्याचा जागेवरून त्यांनी तरूणाशी वाद घातला. दरम्यान हा वाद इतका विकोपाला गेला की तीन जणांच्या या टोळक्याने नीरजवर जीवघेणा हल्ला केला. एकाने त्याच्यावर विटेने हल्ला केल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे, तर दुसऱ्याने नीरजवर लाकडी फळीने हल्ला केला आहे.


Ambernath Crime News : धारधार चाकूने कान कापला 


हा वाद सुरू असताना तिसऱ्या गुंडाने शर्टमध्ये लपवलेल्या धारदार चाकूने हल्ला करत नीरजचा कान कापला. या हल्ल्यात नीरज गंभीर जखमी झाला आहे. या हाणामारीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून जखमी नीरजवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


या तरूणावर चाकूने जीवघेणा हल्ला केला तरी अद्यापही शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल नाही. गावगुंडाकडून अंबरनाथमध्ये हैदोस घातला जात असल्याने परिसरात दहशतीचे वातावरण पसरलं आहे. पोलिसांकडून कोणतीही कारवाई झाली नसल्याने गावगुंडानी हैदोस घातला असून कायदा सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याचे आरोप नगरिकाकडून होत आहे.


फुकटचा वडापाव दिला नाही म्हणून मारहाण


अंबरनाथमध्ये गावगुंडांचा हैदोस सुरूच असून अशीच एक घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. वडापाव फुकट दिला नाही म्हणून हॉटेल चालकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या प्रकरणी आरोपी आकाश विरोधात अंबरनाथ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 


अंबरनाथ पश्चिमेला फॉरेस्ट नाका परिसरात हनुमान मंदिराजवळ माऊली कृपा हॉटेल आहे. या हॉटेलचे चालक शरद आवारे यांच्या हॉटेलमध्ये आकाश हा नेहमीच उधारीवर वडापाव खात होता. तसेच, त्याची बऱ्याच दिवसांपासूनची उधारी शिल्लक होती. त्यामुळे हॉटेल चालकानं फुकट वडापाव देण्यास नकार दिला. तसेच, आता दुकान बंद करायची वेळी झाली आहे आणि वडापावही शिल्लक नाही, त्यामुळे तुला आता वडापाव देऊ शकत नसल्याचं आरोपी आकाशला हॉटेल चालकानं सांगितलं. त्यानंतर, हॉटेल चालकानं आरोपी आकाशला  मागची उधारी शिल्लक आहे, ती तू कधी देणार? अशी विचारणा केली. हॉटेल चालकानं उधारीची विचारणा करताच आरोपी आकाश संतापला. आकाशला राग अनावर झाला आणि त्यानं हॉटेलच्याच बाहेर असलेला सिमेंटचा ब्लॉक उचलला आणि तो थेट हॉटेल चालकाच्या डोक्यात घातला. 


ही बातमी वाचा: 



  • Baramati News : फुकट अंडी न दिल्याने अंडा भुर्जी विक्रेत्याची मारहाण करुन हत्या, बारामतीतील घटना