अंबरनाथ : महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांमध्ये घडलेल्या हिट अँड रन केसमुळे संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त करण्यात येत होता. आता आणखी एक प्रकार समोर आलाय. एका कारने चौघांना उडवल्याची घटना समोर आलीये. जुन्या कौटुंबिक वादातून हा प्रकार घडलाय. यामधील कोणताची मृत्यू झालेला नाही. मात्र, दोन जण गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 






अपघातातील दोघे कार चालक नात्याने चुलत भाऊ


अधिकची माहिती अशी की, अंबरनाथ बदलापूर रोडवर झालेला कार अपघातातील दोघे कार चालक नात्याने चुलत भाऊ असल्याची प्राथमिक माहिती आहे. हे कुटुंब मुंबईचे रहिवाशी असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया अंबरनाथ पोलीस ठाण्यात सुरु आहे.  यात दोन जखमी झाले असून जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 






फॉर्च्युनरला धडक दिल्यानंतर एका व्यक्तीला कारने दूरपर्यंत फरफटत नेण्यात आले


अंबरनाथमघीव जांभूळ फाट्याजवळ असलेल्या मुख्य रस्त्यावर ही घटना घडली. टाटा सफारीच्या एसयुव्हीने चालकाने पांढऱ्या रंगाच्या फॉर्च्युनरचा पाठलाग केला. फॉर्च्युनर रस्त्याच्या बाजूला उभी असताना एसयुव्हीने पाठीमागून येत जोराची धकड दिली. फॉर्च्युनरला धडक दिल्यानंतर एका व्यक्तीला कारने दूरपर्यंत फरफटत नेण्यात आले. दरम्यान, जखमींना तातडीने रुग्णालयात हालवण्यात आले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Nashik Crime : क्रुरतेचा कळस.. सात वर्षीय चिमुरडा बेपत्ता; तीन दिवसांनी झुडपात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?