कल्याण : दिवसा सोसाट्यांमध्ये फिरून रेकी करत घरफोड्या करणाऱ्या बंटी आणि बबलीने शहरात धुमाकूळ घातला होता. पती पत्नी हे त्यांच्या साथीदाराला घेऊन घरफोडी करण्याचा धंदा करीत होती. अखेर एका गुन्ह्याच्या तपासात महात्मा फुले पोलिसांनी त्यांचे बिंग फोडत तिघांना अटक केली आहे. या तिघांकडून तीन गुन्ह्यांची उकल झाली असून पोलिसांनी त्यांच्याकडून 2 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
पतीचे नाव शेखर नायर तर पत्नीचे नाव सुनिता नायर असे आहे. त्यांचा साथीदाराचे नाव देवेंद्र शेट्टी आहे. या आरोपींची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. शेखर व सुनिता हे दोघेही पती-पत्नी अंबरनाथ येथील शिवमंदिराजवळील कैलासनगरात राहणारे आहेत. तर देवेंद्र शेट्टी हा उल्हासनगरातील मद्रासीपाड्यात राहणारा आहे. शेखर व देवेंद्र हे दोघे नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीवरुन चोरीच्या ठिकाणी जायचे. त्याठिकाणी दुचाकी दूरवर लावून पायी चालत जात. शेखर हा खांद्याला सॅक लावून इमारतीत प्रवेश करीत असे त्यानंतर बंद प्लॅट व घराची रेकी करुन घर हेरून ठेवत असे. शेखर बंद घर पाहून देवेंद्र बोलावून घेत असे.
नेटबँकिंगचा नंबर बदलवून व्यापाऱ्याचे 26 लाख लुटले, पोलिसांच्या मदतीनं रक्कम परत मिळाली!
आधी करायचे रेकी आणि नंतर फोडायचे घर
घराचे कुलूप तोडून चोरी करुन दोघेही रिक्षा स्टॅण्डने दुचाकी ठेवलेल्या ठिकाणी येत होते. त्यानंतर दोघांनी लूटन आणलेला माल हा शेखरची पत्नी सुनीता ही लपवून ठेवून त्याची विल्हेवाट लावत होती. ही बाब पोलिस तपासात उघड झाली आहे. कल्याण रामबागेत झालेल्या एका गुन्ह्यात तपास करताना शेखर, त्याची पत्नी सुनिता व त्यांचा साथीदार देवेंद्र हे पोलिसांच्या जाळ्यात सापडले आहेत. या चोरीच्या गुन्ह्यात या त्रिकूटाने वापरलेली दुचाकी, मोबाईल, टॅब, दोन ठिकाणच्या घरफोडीतून लूटलेला एकूण 2 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.