Akola News अकोलाअकोला जिल्ह्यातून गुन्हेगारी (Akola Crime News) क्षेत्रातील एक बातमी समोर आलीये. कुख्यात गुन्हेगार विश्वास सरकटे याच्यावर अकोला पोलिसांनी एमपीडीएअंतर्गत कारवाई केलीय. विश्वासवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच त्याने याआधी अटक करण्यासाठी गेलेल्या चार पोलिसांवर चाकूने (Crime) वार केले होते. यात पोलीस गंभीर जखमी झाले होते. कुठल्याही कारवाईवर विश्वास जुमानत नसल्याने अकोला पोलिसांनी (Akola Police) त्याच्यावर कठोर कारवाई केली आहे. विश्वास सरकटे याला अकोला जिल्हा कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आलंय. 


विश्वासने बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले एएसआय गोपनारायण आणि पोलीस कर्मचारी वीर नारायण शिंदे आणि बोबडे या चौघांवर चाकू हल्ला केला होता. त्यात पोलीस गंभीररित्या जखमी झाले होते. या प्राणघातक हल्यानंतर सर्वत्र मोठी खळबळ उडाली होती.  विश्वास मूळ अकोला जिल्ह्यातील रामगाव येथील रहिवासी असून गेल्या अनेक वर्षापासून तो बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हद्दीत रहिवासी आहे.


विश्वासवर दाखल असलेले गुन्हे


खूनाचा प्रयत्न करणे, लोकसेवकाला त्याचे कर्तव्य पार पाडण्यापासून धाकाने परावृत्त करण्यासाठी हमला किंवा फौजदारीपात्र बलप्रयोग करणे, घातक हत्यारांनी किंवा साधनांनी इच्छापूर्वक जबर दुखापत पोहचवणे, लोकसेवकाला त्याच्या कर्तव्यापासून धाकाने परावृत्त करण्यासाठी इच्छापूर्वक दूखापत पोहचवणे, शांतताभंग करण्याच्या उद्देशाने अपमान करणे, फौजदारीपात्र धाकदपटशा, बेकायदेशिर रित्या अग्निशस्त्र बाळगणे इत्यादि अनेक गुन्हे  त्याच्यावर दाखल असुन यापुर्वी विवीध कलमान्वये प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आली होती, परंतु त्याच्यावर त्याचा काहीच परिणाम झालेला नव्हता. 


आतापर्यंत 7 गुन्हेगारांवर एमपीडीए नुसार कारवाई


अकोला पोलिसांचा प्रतिबंधक कारवाईवर चांगलाचं जोर वाढला आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता अकोला पोलिसांनी थेट सराईत गुन्हेगारांना एका वर्षासाठी तुरुंगाचा मार्ग दाखवला आहे.  दरम्यान अकोला जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी. तसेच वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी अशा प्रकारचे गुन्हे करणारे आणि कारवाईला न जुमानणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर कारवाई केली जात आहे. येणाऱ्या निवडणुका तसेच आगामी काळात सण-उत्सवाच्या अनुषंगाने अनेक गुन्हेगार पोलिसांच्या वाटेवर असून या गुन्हेगाराविरुध्द एमपीडीएनूसार कारवाई केली जात आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी दिली आहे. अकोला जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यात आतापर्यंत 7 गुन्हेगारांवर एमपीडीए नुसार कारवाई करण्यात आली असून ही कामगिरी पीएसआय आशिष शिंदे यांनी केली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या