Ahmednagar Crime News : आईसह दोन मुलींनी केलेल्या आत्महत्येमुळे अकोले हादरलं आहे. मन्याळे गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. सुनिता जाधव (वय 48), प्राजक्ता जाधव (वय 22) आणि शितल जाधव ( वय 18) अशी मृतांची नावे आहेत. घडलेल्या प्रकारामुळे गावात शोककळा पसरली असून आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.


अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील मन्याळे गावात ही दुर्देवी घटना घडली. मुलींची आई सुनिता जाधव यांनी गळफास घेत आत्महत्या केली. तर, त्यांच्या मुली प्राजक्ता जाधव आणि शितल जाधव या दोघींनी विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. आईने आत्महत्या केल्यानंतर मुलीनी देखील आत्महत्या केली असल्याचे प्राथमिक माहिती आहे. 


या तिघींचेही मृतदेह सध्या अकोले ग्रामीण रुग्णालयात आहेत. पोलीस तपासानंतर आत्महत्येचे कारण स्पष्ट होणार असल्याचे म्हटले जात आहे. तिघीच्या आत्महत्येमुळे मन्याळे गावावर शोककळा पसरली आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. 


आणखी वाचा :


यंदाचा उन्हाळा घामटा काढणार, मार्च ते मे महिन्यात अंगाची लाहीलाही होणार