Mumbai Crime: मर्चंट नेव्हीमध्ये (Merchant Navy) नोकरी मिळवून देतो असे सांगून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची लाखोंची फसवणूक करणाऱ्या भामट्याला दहिसर पोलिसांनी (Dahisar Police) अटक केली आहे. या प्रकरणामागे मोठे रॅकेट असल्याचा पोलिसांना संशय असून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान, संबंधित आरोपी रवी कुमार अशोक कुमार शर्मा (वय 30 वर्षे ) या आरोपीस नवी दिल्लीतून अटक करण्यात आली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, दहिसर परिसरात राहणाऱ्या सुशिक्षित बेरोजगार तरुणाला नोकरीची आवश्यकता असल्याने त्याने Naukri.Com हे अ‍ॅप्लिकेशन (Application) डाउनलोड केले आणि त्यावर स्वतःचे अकाऊंट प्रोफाईल (Profile) तयार केले. Naukri.Com अ‍ॅपवरून आरोपीने तरुणाची माहिती मिळवली आणि त्याच्याशी संपर्क साधला. आरोपीने जतिन शर्मा नावाने तक्रारदार तरुणाशी संपर्क साधला, तो CMA-CGM मा मर्चंट नेव्ही कंपनीमध्ये एचआर रिक्रूटर (HR Recruiter) असल्याचे खोटे सांगून तरुणाला मर्चंट नेव्हीमध्ये नोकरी लावण्याचे आमिष त्याने लावले.


आरोपीने तरुणाची कागदपत्रे (Documents) प्राप्त केली आणि त्यानंतर Unique Placement/CMA-CGM या बनावट ईमेल आयडीवरून तरुणाला बनावट जॉइनिंग लेटर (Joining Letter) पाठवले. आरोपीने तरुणाच्या कागदपत्रांची पडताळणी (Document Verification), मेडिकल चाचणी (Medical Test), इमिग्रेशन (Immigration), सिक्युरिटी चार्जेस (Security Charges), शिकवणी (Training) या सर्वासाठी 4 लाख 47 हजार रूपये लागतील, असे सांगितले. त्यानंतर त्वरित तरुणाने दिलेल्या एच.डी.एफ.सी. बँक खात्यावर (HDFC Bank Account) 4 लाख 47 हजार रूपये पाठवले. संबंधित प्रकार बनावट असल्याचे तरुणाला नंतर समजले. फसवणुकीच्या या प्रकारानंतर तरुणाने दहिसर पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केली.


दहिसर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन झोन बारा (Zone 12) डीसीपी स्मिता पाटील आणि दहिसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय बांगर (गुन्हे शाखा), सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश दांडगे आणि पथकाने प्रकरणाचा तपास सुरू केला. 


ज्या बँक खात्यातून तरुणाची फसवणूक झाली, त्या बँक खात्याची माहिती (Bank Details) घेवून आणि इतर तांत्रिक मदत (Technical Help) घेवून आरोपी कोण आहे आणि कुठे राहतो याबाबतची सर्व माहिती पोलिसांनी गोळा केली. दहिसर पोलिसांनी मिळवलेल्या माहितीच्या आधारे आरोपीला नवी दिल्लीतील बेगमपूर येथून अटक करण्यात आली.


हेही वाचा:


Election : मुंबईसह रखडलेल्या महापालिका निवडणुका ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होऊ शकतात; देवेंद्र फडणवीसांचे संकेत