मुंबई - शहरातील कांदिवली भागात अपना गॅस कंपनीवर शिधावाटप विभागाने मोठी कारवाई केली होती. यावेळी अवैध प्रमाणात साठवलेल्या गॅस गोदामावर छापा मारला असून गॅस माफियांचे 15 ट्रक जप्त करण्यात आले होते. या प्रकरणात गॅस माफिया आझाद खान याच्यासह 4 जणांना अटक केल्यानंतर न्यायालयाने आरोपींना शुक्रवारपर्यंत पोलीस (Police) कोठडी दिली. तसेच जप्त केलेले सिलेंडरप्रकरणी पुढील चौकशी सुरु आहे. शिधावाटप विभागाच्या सुधाकर तेलंग आणि गणेश बेल्लाळे यांच्या नियंत्रणाखाली ही कारवाई करण्यात आलीय. दिवाळी काळात गॅस सिलेंडरच्या काळा बाजारी करणाऱ्या 5 जणांच्या टोळीला मुंबईच्या (Mumbai) कांदिवली पोलिसांनी अटक केली आहे. शिधावाटप कार्यालयाकडून कांदिवली पश्चिममधील एकता नगर परिसरात गॅस सिलेंडरच्या काळा बाजार करणाऱ्या गोडाऊनमध्ये रेड करण्यात आली होती. शिधावाटप अधिकाऱ्यांच्या या कारवाईमध्ये जवळपास 15 सिलेंडरचे ट्रक सोबत 700 पेक्षा जास्त गॅस सिलेंडर सील करण्यात आला आहे.
कांदिवली शिधा वाटप युनिटला खबऱ्यांकडून माहिती मिळाली होती, कांदिवली पश्चिम एकता नगर परिसरात गॅस सिलेंडरच्या मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू आहे. याच माहितीच्या अनुषंगाने कांदिवली शिधावाटप युनिटकडून छापा कारवाई करण्यात आली, त्यामध्ये सातशे पेक्षा जास्त सिलेंडर सोबत 15 ट्रक सील करण्यात आले आहेत. शिधा वाटप अधिकाऱ्यांकडून कांदिवली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केल्यानंतर कांदिवली पोलिसांकडून या पाचही आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक आरोपीचे नाव आझाद जमाल खान वय 46 वर्ष,नदीम वय 30 वर्ष,ब्रिजेश मोरया वय 26 वर्ष,राजेश यादव वय 24 वर्ष,दीपक सरोज वय 25 वर्ष असून या आरोपीकडून कांदिवली परिसरामध्ये गॅस सिलेंडरच्या मोठ्या प्रमाणात काळाबाजार केला जात होता. अटक 5 आरोपीला कांदिवली पोलिसांनी बोरिवली कोर्टात हजर केले असता कोर्टामधून पाचही आरोपींना 25 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या आरोपीच्या टोळीमध्ये आणखी कोण सदस्य आहे का आणि या आरोपींनी कुठून गॅस सिलेंडर आणून कसा काळाबाजार करत होते, या संदर्भात अधिक तपास कांदिवली पोलीस करत आहेत.
12 टन तांदळाचा ट्रक पकडला
भिवंडी अंजुरफाटा येथील राष्ट्रीय खाद्य निगमच्या गोदामातून शिधावाटप यंत्रणेचा 12 टन तांदूळ कल्याण येथील शिधावाटप दुकानांत विक्री करण्यासाठी घेऊन जात असताना ट्रक क्रमांक एम एच 04 जी सी 2756 च्या चालकाने ट्रक मधील जीपीएस यंत्रणा बदलून साईबाबा राजनोली नाका येथून आपला ट्रक हा मुंबई नाशिक महामार्गावरून पडघा पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाशेरे गावात विक्री करता नेला. याची माहिती कल्याण येथील खडकपाडा पोलिसांना मिळताच पोलिसांनी ट्रकचा पाठलाग केला. सदरच्या ट्रक मधील 4 लाख 80 हजार रुपये किमतीचा 240 गोणींमधील 12 हजार किलो तांदूळ भादाणे येथील जय आनंद फूड इंडस्ट्रीज च्या गोदामात उतरवत असताना पोलिसांनी जप्त केला आहे. शिधावाटप अधिकारी यांच्या तक्रारीनंतर कल्याण खडक पाडा पोलिसांनी ट्रकचालक आशिष रमेश जगताप यास ताब्यात घेऊन सदरचा तांदूळ जप्त करून जय आनंद फूड इंडस्ट्रीज कंपनीस सिल ठोकले असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
हेही वाचा
लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही; ओक्केमधीच नियोजन; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा शब्द