मुंबई : झोमॅटो कंपनीच्या शेअरमध्ये (Zomato Company Share Information) आज सकारात्मक चढउतार दिसले. आज म्हणजेच 5 एप्रिल रोजी या कंपनीचा शेअर थेट 191.90 रुपयांपर्यंत पोहोचला होता. गेल्या वर्षभरात या शेअरची सकारात्मक कामगिरी राहिली आहे. आकडेवारीत सांगायचं झाल्यास नव्या वर्षात हा शेअर 55 टक्के वाढला आहे. 


190 रुपयांपर्यंत पोहोचला कंपनीचा शेअर (Zomato Share Price Information)


झोमॅटो या कंपनीकडून लोकांना ऑनलाईन पद्धतीने अन्न पोचवले जाते. या कंपनीने आपला आयपीओ बाजारात आणला होता, तेव्हा त्याचे मुल्य 76 रुपये होते. आता या कंपनीचा शेअर 190 रुपयांपर्यंत पोहोचला आहे.  म्हणजेच सध्या या कंपनीच्या शेअरमध्ये साधारण अडीच पट वाढ झालेली आहे. झोमॅटो कंपनीचा शेअर गेल्या 52 आठवड्यांत सर्वाधिक 51.30 रुपयांपर्यंत घसरलेला (52 Week Low) आहे.


गेल्या वर्षभरात 271 टक्क्यांनी वाढ 


गेल्या वर्षभरात झोमॅटोच्या शेअरमध्ये वाढ पाहायला मिळालेली आहे. आकड्यांत सांगायचे झाल्यास ही वाढ 271 टक्के आहे. या कंपनीचा शेअर 5 एप्रिल 2023 रोजी 51.57 रुपये होता. आता 5 एप्रिल 2024 रोजी हाच शेअर 191.90 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. गेल्या सहा महिन्यांत या शेअरची 83 टक्के वाढ झाली आहे. 5 ऑक्टोबर 2023 रोजी हा शेअर 105.45 रुपयांवर होता. महिन्याभरापासून या शेअरचा आलेख चढाच राहिलेला पाहायला मिळतोय. एका महिन्यात झोमॅटोच्या शेअरमध्ये 15 टक्के वाढ झाली आहे.


तज्ज्ञ काय सांगतात?


 मनिकंट्रोल या शेअर बाजारविषयक माहिती देणाऱ्या संकेतस्थळानुसार 23 अॅनालिस्टपैकी साधारण 70 टक्के अॅनालिस्ट हे शेअर खरेदी करता येतील असे सांगत आहेत. तर साधारण 13 टक्के तज्ज्ञ तुमच्याकडे असलेले या कंपनीचे शेअर विकून टाकावेत, असं सांगतायत. कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटिज या ब्रोकरेज हाऊसच्या मतानुसार झोमॅटोचा शेअर खरेदी करत असाल तर प्राईस टार्गेट 210 रुपये ठेवायला हवे. याच ब्रोकरेज हाऊसने याआधी प्राईस टार्गेट 190 रुपये ठेवले होते. मार्च 2024 च्या तिमाहीत हा शेअर चांगली कामगिरी करू शकतो, असे कोटकचं मत आहे.


(टीप- आम्ही कोणताही शेअर खरेदी किंवा विक्री करण्याची शिफारस करत नाही. तुम्हाला शेअर बाजारात गुंतवणूक करायची असल्यास सखोल चौकशी करावी. या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)


हेही वाचा :


लाखो रुपयांचे बिटकॉइन्स, विदेशी शेअर बाजाराची आवड; शशी थरुर यांच्या गुंतवणुकीचा फंडा पाहून चकित व्हाल!


पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल! 'या' आयपीओने मिळवून दिला तब्बल 173 टक्के नफा!


काय सांगता! शाहाकारी थाळी वर्षभरात 7 टक्क्यांनी महागली, नॉनव्हेज मात्र स्वस्त!