India Forex Reserves: भारताच्या परकीय चलनसाठ्यात (Indias foreign currency) मोठी वाढ होताना दिसत आहे. मार्च 2024 या महिन्यात परकिय चलनासाठ्यानं नवीन विक्रम केला आहे. परकीय चलनसाठा 645 अब्ज डॉलर इतक्या विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. RBI चे गव्हर्नर शक्तीकांत दास (Shaktikanta Das) यांनी याबाबतची माहिती दिलीय. शक्तीकांत दास यांनी नवीन आर्थिक वर्षातील पहिल्या आर्थिक धोरणाची बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती दिली.  


गेल्या आठवड्यात परकीय चलनाठ्यात सुमारे 3 अब्ज डॉलरची वाढ


मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात परकीय चलनाठ्यात सुमारे 3 अब्ज डॉलरची वाढ झालीय. त्यामुळं भारत बाह्य गरजा पूर्ण करण्यासाठी पूर्ण सक्षण असल्याची माहिती गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी दिली. दरम्यान, या महिन्यात परकीरय चलनसाठ्यानं आत्तापर्यंतचा विक्रम केला आहे. 645 अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. दरम्यान, 2021 मध्ये देखील परकीय चलनसाठा हा 642 अब्ज डॉलरवर पोहोचला होता. 


रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धादरम्यान परकीय चलनसाठ्यात मोठी घट


रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धादरम्यान, परकीय चलनसाठ्यात मोठी घट झाली होती. मात्र, या युद्धानंतरच्या काळात परकीय चलनसाठ्यात चांगली वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धाच्या काळात देशाचा परकीय चलनसाठा हा 524 अब्ज डॉलरवर आला होता. त्यामुळं चिंता व्यक केली जात होती. मात्र, त्यानंतरच्या काळात परकीय चलनसाठ्यात चांगली वाढ झाल्याचे दिसून आले.