Success Story : इच्छाशक्ती आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर कोणताही माणूस यशापर्यंत पोहोचतो. अलीकडच्या काळात अनेक तरुण कष्टाच्या जोरावर शेतीत (agriculture) नवनवीन प्रयोग करताना दिसत आहे. यामाध्यमातून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवत आहेत. आज आपण अशाच एका तरुणाची यशोगाथा (Success Story) पाहणार आहोत, ज्या तरुणाने हिरव्या मिरचीच्या (chilli) लागवडीतून लाखो रुपये कमावले आहेत. विशेष म्हणजे हा तरुण 10 वी नापास आहे. 


एका हंगामात दोन लाख रुपयाहून अधिकचे उत्पन्न


उत्तर प्रदेशातील रायबरेली जिल्ह्यातील लालपूर गावात राहणाऱ्या दुर्गेश कुमार लोधी या तरुणाने मिरचीच्या लागवडीतून मोठं उत्पन्न घेतलं आहे. 2018 साली दुर्गेश 10 वी च्या परिक्षेत नापास झाला. त्यानंतर त्याला अनेकांनी हिनवलं. पण त्याने इतरांकडे लक्ष न देता शेती करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला दुर्गेशने रायबरेली कृषी केंद्रातून माहिती मिळवली. त्यानंतर आपल्या शेतात त्याने भोपळ्यासह मिरचीची लागवड केली. या दोन्ही पिकाच्या लागवडीतून दुर्गेश एका हंगामात दोन लाख रुपयाहून अधिक पैसे मिळवत आहे. मिरची आणि भोपळ्याच्या लागवडीसाठी 30 ते 40 हजार रुपयांचा खर्च आल्याची माहिती दुर्गेशने दिली आहे. 


लागवड करताना योग्य ती काळजी घ्यावी


मिरची आणि भोपळा लागवड केल्यानंतर त्याला वेळोवेळी पाणी द्या. भोपळ्याची लागवड करताना दोन झाडांमध्ये 15 ते 20 सेंटीमीटरचे अंतर ठेवा. तर मिरचीच्या दोन झाडांमधील अंतर हे  35 ते 40 सेंटीमीटर असावे. त्यामुळं झाडाची चांगली वाढ होऊन उत्पन्न वाढण्यास मदत होते. 


हिरवी मिरचीते फायदे


मिरची ही स्वयंपाकघरात आवश्यक असणारी वस्तू आहे. कोणत्याही पदार्थाची चव वाढवण्याचे काम मिरची करते. हिरव्या मिरचीमध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-सी, लोह, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम सारखे पोषक तत्व आढळतात. ज्यामुळे शरीराला अनेक फायदे मिळू शकतात. इतकंच नाही तर हिरव्या मिरचीमध्ये capsaicin नावाचं कंपाऊंड आढळून येतं, जे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगलं मानलं जातं. त्यामुळं मिरची खाणं हे देखील आरोग्याच्या दृष्टीनं चांगलं आहे. 


मिरची आणि भोपळ्याच्या शेतीच्या माध्यमातून कमी काळात अधिक नफा


मिरची आणि भोपळ्याच्या शेतीच्या माध्यमातून शेतकरी कमी काळत अधिक नफा मिळवू शकतात. फक्त लागवड करताना योग्य ते नियोजन करणं गरजेचं आहे. विशेष म्हणजे दुर्गेश या तरुणाचे फार काही शिक्षण झालेले नसतानाही कष्टातून आणि कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनाने लाखो रुपयांचे उत्पन्न काढले आहे. 


महत्वाच्या बातम्या:


कांदा निर्यातबंदी हटवली, शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळणार, लवकरच पंतप्रधानांचींही सभा : भारती पवार