Success Story : अलिकडच्या काळात तरुण शेतकरी (Farmers) शेतात नव नवीन प्रयोग करत आहेत. पारंपारिक शेतीला बगल देत आधुनिक पध्दतीनं शेती पिकांची लागवड करत आहेत. यातून चांगला नफा देखील मिळत आहेत. आज आपण अशाच एका प्रयोगशील शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. या शेतकऱ्यानं पारंपारीक पिकांना बगल देत गुलाब शेतीतून (rose cultivation) आपली प्रगती साधलीय. हा तरुण गुलाब शेतीतून आज लाखो रुपये कमावत आहे. 


उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील सहेलिया येथील युवा शेतकरी अमन याने गुलाब शेतीचा यशस्वी प्रयोग केलाय. या तरुण शेतकऱ्यांनं सर्व पारंपारिक पिकांना बगल दिली आहे. पूर्वी हा शेतकरी गहू, तांदूळ अशी पारंपारीक पिकांची लागवड करत होता. मात्र, आता त्याने गुलाब शेती करण्यास सुरुवात केलीय. या फुलशेतीतून अमन लाखो रुपयांची कमाई करत आहे. व्यावसायिक स्तरावर गुलाबाची लागवड करुन चांगला नफा मिळवता येत असल्याची माहिती अमनने दिली. 


फुलशेतीतून अमनला वार्षिक तीन ते चार लाख रुपयांचा निव्वळ नफा 


दरम्यान, अमनने लावलेल्या फुलांची निर्यात देशासह परदेशात देखील होते. त्यामुळं या विक्रीतून त्याला चांगला फायदा मिळतो. या फुलशेतीतून अमनला वार्षिक तीन ते चार लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळत आहे. गुलाब शेती अमनला इतर शेतीपेक्षा फायद्याची ठरत आहे. कारण इतर पिकांच्या तुलनेत गुलाब शेतीच्या लागवडीचा खर्च कमी आहे. खर्च कमी आणि उत्पन्न जास्त आहे. त्यामुळं गुलाब शेती परवडते. विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारच्य किटकनाशकांचा वापर करण्याची गरज नसते. त्यामुळं जास्त खर्च होत नाही. 


सुरुवातीला गुलाबाच्या लागवडीसाठी 25 ते 30 हजार रुपयांचा खर्च 


दरम्यान, अमनने दिलेल्या माहितीनुसार, पूर्वी गहू, तांदूळ यासारखी पारंपारीक पिकांची लागवड केली जात होती. त्याचा फारसा काही फायदा होत नव्हता. त्यानंतर मी फुलशेती करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती अमनने दिली. सुरुवातीला गुलाबाच्या लागवडीसाठी 25 ते 30 हजार रुपयांचा खर्च आला. मात्र, त्यानंतर मोठ्या प्रमाणात या फुलशेतीतून उत्पन्न मिळू लागल्याची माहिती अमनने दिली. फुलांची लागवड करताना काही काळजी घेणं गरजेचं असतं. पाण्याचा निचरा होणारी जमीन लागवडीसाठी योग्य ठरते. तसेच एक ते दीड फुटांवर रोपांची लागवड करावी. त्यानंतर पुढच्या तीन महिन्यातच रोपांना विक्रीसाठी फुले येतात. पुढच्या सात ते आठ महिने या फुलांची विक्री करता येते. त्यामुळं फुलशेती परवडते. कमी खर्च, कमी कष्ट आणि नफा अधिक असं या फुलशेतीचं समीकरण आहे. 


महत्वाच्या बातम्या:


2 कोटी रुपयांची नोकरी सोडून सुरु केलं स्टार्टअप, कशी मिळाली आयुष्याला कलाटणी? तरुण उद्योजकाची यशोगाथा