Xiaomi Layoff : चीनची स्मार्टफोन कंपनी Xiaomi ने सध्याच्या आर्थिक मंदीच्या काळात 900 हून अधिक नोकऱ्या कमी केल्या आहेत, कारण जून तिमाहीत (Q2) त्याचा महसूल जवळपास 20 टक्क्यांनी घसरला आहे. साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या म्हणण्यानुसार, शाओमीच्या सुमारे 3 टक्के कर्मचार्‍यांवर याचा परिणाम झाल्याचे सांगण्यात येत आहे. 


कंपनीच्या कर्मचाऱ्यांची स्थिती
30 जून 2022 पर्यंत, कंपनीत 32,869 पूर्णवेळ कर्मचारी होते, त्यापैकी 30,110 मुख्य चीनमध्ये होते, बाकीचे प्रामुख्याने भारत आणि इंडोनेशियामध्ये होते. त्याच कालावधीत कंपनीचे R&D क्षेत्रात 14,700 कर्मचारी होते.


Xiaomi चे अध्यक्ष वांग जियांग म्हणाले..
 कंपनाच्या उत्पन्नाचा अहवाल सादर केल्यानंतर विश्लेषकांशी झालेल्या कॉल दरम्यान, Xiaomi चे अध्यक्ष वांग जियांग म्हणाले, "या तिमाहीत, आमच्या कंपनीला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला, ज्यात जागतिक चलनवाढ, परकीय चलनातील अस्थिरता, आणि राजकीय वातावरण यांचा समावेश आहे. या आव्हानांचा एकूण बाजारातील मागणी आणि या कालावधीसाठी कंपनीवर लक्षणीय आर्थिक परिणाम झाला,असे जियांग म्हणाले.


स्मार्टफोन कंपनीचा महसूल 28.5 टक्क्यांनी घसरला
स्मार्टफोन विभागातील महसूल 28.5 टक्क्यांनी घसरला आहे, 'प्रामुख्याने आमच्या स्मार्टफोन विक्रीत घट झाल्यामुळे गतवर्षीच्या दुसऱ्या तिमाहीत महसूल 59.1 अब्ज युआन वरून यंदा 42.3 अब्ज युआन झाला आहे. 2022 च्या दुसऱ्या तिमाहीत, जागतिक मंदी आणि COVID-19 परिस्थितीमुळे स्मार्टफोन्सच्या एकूण बाजारपेठेच्या मागणीवर परिणाम करत आहे," असे Xiaomi ने सांगितले.


ग्लोबल स्मार्टफोन उद्योगाच्या शिपमेंटमध्ये घसरण
कॅनालिसच्या म्हणण्यानुसार, जागतिक स्मार्टफोन उद्योगाच्या शिपमेंटमध्ये वर्ष-दर-वर्ष 8.9 टक्के आणि दर तिमाहीत 7.7 टक्के घट झाली. मुख्य भूप्रदेश चीनमधील शिपमेंट वर्ष-दर-वर्ष 10.1 टक्के आणि दर तिमाहीत  10.9 टक्के घसरली.


चीनी समूह टेसेंटने 5500 कर्मचाऱ्यांना काढून टाकले
यापूर्वी, चीनी समूह Tencent ने जून तिमाहीत $19.8 अब्ज महसूल पोस्ट केल्यानंतर 5,500 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते,  बर्‍याच मोठ्या टेक कंपन्या, युनिकॉर्न आणि स्टार्टअप्सनी जागतिक मॅक्रो-इकॉनॉमिक परिस्थितीमध्ये कर्मचारी काढून टाकले आहेत.


अमेरिकेसारख्या मोठ्या देशात आर्थिक स्थिती बिकट
जगातील आर्थिक स्थिती चांगली नाही, त्यामुळे अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना काढण्यामागे व्यस्त आहेत. अमेरिकेसारख्या मोठ्या देशात आर्थिक स्थिती बिकट आहे. या ना त्या कारणाने सर्वात मोठ्या कंपनीत भरतीवर बंदी घालण्यात आली आहे. ज्यांना कंपनीत रुजू होण्यास सांगितले होते, त्यांना आता घरून काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या


Sovereign Gold Bond Scheme: फक्त 5197 रुपयांत सरकारकडून खरेदी करा सोनं, जाणून घ्या कसं?


Share Market Opening : शेअर बाजारात विक्रीचा दबाव, सेन्सेक्स 350 हून अंकांनी घसरला