WPI Inflation : डिसेंबर महिन्यात अन्नपदार्थांच्या किमती कमी झाल्याचा परिणाम घाऊक महागाई दरावर दिसून आला नाही. घाऊक महागाईचा दर डिसेंबरमध्ये 0.73 टक्के झाला आहे, जो मागील महिन्यात म्हणजेच नोव्हेंबर 2023 मध्ये 0.26 टक्के होता. घाऊक महागाई दराचा हा आकडा गेल्या 9 महिन्यांतील उच्चांक आहे. वाणिज्य मंत्रालयाने आज दुपारी ही आकडेवारी जाहीर केली आहे. सलग दुसऱ्या महिन्यात घाऊक महागाई दर शून्य टक्क्यांच्या वर आहे. खाद्य महागाई आणि इंधन, ऊर्जा महागाई दरात वाढ झाल्यानं घाऊक महागाईत वाढ झाली आहे. वाणिज्य मंत्रालयाकडून याबाबतची आकडेवारी जारी करण्यात आली आहे.
घाऊक महागाई दर डिफ्लेशन झोनमधून बाहेर पडत आहे
हा सलग दुसरा महिना आहे जेव्हा घाऊक महागाईचा दर शून्याच्या वर आला आहे. 2023-24 या वर्षातील आत्तापर्यंतच्या आकडेवारीवर नजर टाकली तर ते डिफ्लेशन झोनच्या श्रेणीत म्हणजेच -1.1 टक्के आहे. WPI महागाई दराच्या तीन मुख्य गटांच्या चलनवाढीच्या दरात घट झाली आहे. प्राथमिक वस्तूंच्या महागाई दरात 2.1 टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली आहे.
इंधन आणि उर्जा किंमत निर्देशांकात 0.71 टक्क्यांची घसरण
इंधन आणि उर्जा किंमत निर्देशांकात 0.71 टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली आहे.
तसेच उत्पादित उत्पादनांच्या किंमत निर्देशांकात 0.21 टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली आहे. परिणामी, मागील महिन्याच्या तुलनेत सर्व कमोडिटी निर्देशांकांमध्ये 0.85 टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली आहे.
अन्नधान्याच्या महागाई दरातही घसरण
नोव्हेंबरच्या तुलनेत, मागील महिन्याच्या म्हणजेच नोव्हेंबरच्या तुलनेत खाद्यपदार्थांच्या किमतीत 1.78 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे. भाजीपाला, फळे, अंडी, मांस आणि मासे यांच्या किमतीत झालेली घट आणि डाळींच्या किमती हे त्याचे प्रमुख कारण आहे.
डिसेंबर महिन्यात किरकोळ महागाई दरात वाढ दिसून आली आहे. किरकोळ महागाई दर 5.69 टक्के राहिला आहे. ही वाढ प्रामुख्यानं खाद्यपदार्थांच्या किंमतीत वाढ झाल्यामुळं झाल्याचे सांगण्यात येत आहे.