Worls most expensive cow : भारतासह (India) इतर देशात विविध प्रकारच्या गायी (cow) आहेत. या गायी त्यांच्या खास वैशिष्ट्यांसाठी प्रसिद्ध आहेत. आज आपण अशाच एका वेगळ्या गायीची माहिती पाहणार आहोत. ज्या गायीची बाजारात 40 कोटी रुपयांना विक्री झाली आहे. ब्राझीलमध्ये (Brazil) या गायीला विक्रमी किंमत मिळाली आहे. ही गाय जगातील सर्वात महाग गाय ठरली आहे.  जाणून घेऊयात या गायीबद्दल सविस्तर माहिती. 


Worls most expensive cow : जगातील सर्वात महागडी गाय 


सध्या ब्राझीलमध्ये विक्री केलेल्या एका गायीची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. ही गाय तब्बल 40 कोटी रुपयांना विकली गेलीय. ब्राझीलमध्ये साओ पावलो मधील अरांदू इथं झालेल्या लिलावात या गायीला ही विक्रमी किंमत मिळालीय. विशेष म्हणजे ही गाय भारतीय नेल्लोर (Nelore) वंशाची आहे. ब्राझीलमध्ये नेल्लोर आणि गीर या गायी प्रसिद्ध आहेत. ब्राझीलमध्ये 40 कोटी रुपयांना विक्री केलेली नेल्लोर वंशाची गाय जगातील सर्वात महागडी गाय ठरली आहे. ही गाय आंध्र प्रदेशातील नेल्लोर वंशाची आहे. या गायीला नेल्लोर जिल्ह्याच्या नावावरुन हे नाव ठेवण्यात आलं आहे. ब्राझीलमध्ये या जातीच्या गायीला मोठी मागणी आहे. 1868 च्या काळात या गायीच्या प्रजाती ब्राझीलला पाठवण्यात आल्या होत्या. त्यानंतर 1960 च्या आसपास देखील या वंशाच्या गायी ब्राझीलमध्ये नेण्यात आल्या होत्या.


अतिशय उष्ण तापमानतही या गायी तग धरु शकते


नेल्लोर वंशाच्या गायी त्यांच्या वेगळेपणासाठी ओळखल्या जातात. अतिशय उष्ण तापमानतही या गायी तग धरु शकतात. ब्राझीलमध्ये तापमान जास्त असते. तरीही या गायी त्या वातावरणात तग धरु शकतात. ही पैदासासाठी देखील पाळली जाते. या गायींपासून चांगल्या प्रकारची वासरे तयार केली जातात. ब्राझीलमधील जवळपास 80 टक्के लोकांकडे याच वंशाच्या गायी आहेत. 


नेल्लोर जातीच्या गायीचं वेगळेपण काय?


नेल्लोर जातीच्या गायी या पांढऱ्याशुभ्र असतात. 
ब्राझीलमध्ये 80 टक्के गायी या नेल्लोर जातीच्या
नेल्लोर जातीच्या गायीची दूध देण्याची क्षमताही चांगली आहे. 
गायीची त्वचा डा आहे, त्यामुळं कोणत्याही किटकांचा प्रभाव होत नाही
उष्ण वातावरणातही नेल्लोर जातीच्या गायी तग धरु शकतात.


दरम्यान, ब्राझीलमध्ये 40 कोटी रुपयांना विक्री केलेली नेल्लोर वंशाची गाय जगातील सर्वात महागडी गाय ठरली आहे. ही गाय आंध्र प्रदेशातील नेल्लोर वंशाची आहे. 


महत्वाच्या बातम्या:


5 गायीपासून दुग्ध व्यवसायाला सुरुवात, आज महिन्याला 7 लाखांचा नफा, जिद्दी महिलेची यशोगाथा