Women Financial Planning : अलीकडच्या काळात लोकांचे गुंतवणुकीबाबत (Investment) प्राधान्यक्रम बदलत आहेत. विविध ठिकाणी लोक पैशांची गुंतवणूक करत आहेत. कारण, भविष्यात कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी अनेकजण आर्थिक नियोजन करत आहेत. दरम्यान, अलीकडच्या काळात महिलांचे गुंतवणूक करण्याचे प्राधान्यक्रम बदलत आहेत. महिला स्वतःसाठी कमी आणि मुलांसाठी जास्त विचार करत आहेत. अलीकडेच, DCB बँकेने CRISIL च्या सहकार्याने महिला आणि वित्त व्यवस्थापनावर एक अभ्यास केला. महिलांच्या पैशांच्या व्यवस्थापनाबाबत या अभ्यासात अनेक मोठे खुलासे समोर आले आहेत.
जगातील प्रत्येक पालकाला आपल्या मुलाचं उद्याचं भविष्य उज्वल करायचे आहे. त्यामुळं गुंतवणुकीबाबत लोकांचे प्राधान्यक्रम दिवसें दिवस बदलत असल्याचं चित्र दिसत आहे. काही स्वत:साठी बचत करतात तर काही श्रीमंत होण्यासाठी करत आहेत. अशातच महिलांच्या प्राधान्य आणि गुंतवणुकीबद्दल बोलायचे झाले तर त्यांची विचारसरणी पूर्णपणे वेगळी आहे. अलीकडेच, DCB बँकेने CRISIL च्या सहकार्याने महिला आणि वित्त व्यवस्थापनावर एक अभ्यास केला. महिलांच्या पैशांच्या व्यवस्थापनाबाबत या अभ्यासात अनेक मोठे खुलासे झाले आहेत.
शहरातील 47 टक्के महिला पैशाशी संबंधीत निर्णय स्वतः घेतात
अभ्यासातून मिळालेल्या माहितीनुसार, भारतातील मोठ्या शहरांमधील सुमारे 47 टक्के कमावत्या महिला पैशाशी संबंधित निर्णय स्वतः घेतात. तर 98 टक्के महिला कुटुंबाच्या निर्णयावर अवलंबून असतात. पैशाशी संबंधित निर्णय घेण्यासाठी ती तिच्या कुटुंबाचा सल्ला घेते. ज्यामध्ये कधीकधी खूप वेळ जातो.
प्रथम मुलांच्या शिक्षणासाठी आणि भविष्यासाठी आर्थिक नियोजन
अभ्यासात मिळालेल्या माहितीनुसार, 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या स्त्रिया त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि भविष्यासाठी प्रथम आर्थिक नियोजन करतात. यानंतर निवृत्तीला त्याचे प्राधान्य आहे. गुंतवणुकीच्या बाबतीत, कार्यरत भारतीय महिला अनेकदा जोखीम टाळतात आणि एफडी (51 टक्के) आणि बचत खाती यांसारख्या कमी जोखमीच्या गुंतवणूक पर्यायांना प्राधान्य देतात.
गुंतवणुकीसाठी महिला शोधतायेत वेगवेगळे पर्याय
महिलांसाठी गृहकर्ज हा कर्ज घेण्याचा पसंतीचा पर्याय ठरला आहे. महिला UPI सारख्या डिजिटल पेमेंट पद्धतींचा अवलंब करत आहेत. हे आर्थिक बाबींमध्ये सक्रिय नियोजक म्हणून भारतीय महिलांची वाढती भूमिका अधोरेखित करते. पूर्वी महिलांना त्यांच्या आर्थिक निर्णयांवर नियंत्रण नसण्याचे मुख्य कारण म्हणजे जागरुकता, आर्थिक साक्षरता आणि ज्ञानाचा अभाव होता. आता आधुनिक जगात काळ बदलत आहे. महिला पैशांच्या व्यवस्थापनाबाबत जागरुक होत आहेत. बचतीसाठी महिला गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय शोधत आहेत.
महत्वाच्या बातम्या: