Warren Buffett Wealth: जगातले दिग्गज शेअर बाजार गुंतवणूकदार आणि बर्कशायर हॅथवे कंपनीचे मालक वॉरेन बफेट हे अब्जाधीश आहेत. बफेट या जगातून गेल्यावर त्यांच्या संपत्तीचे नेमके काय होणार? असे नेहमी विचारले जाते. याच प्रश्नाविषयी आता नवी बाब समोर आली आहे. सध्या वॉरेन बफेट हे 93 वर्षांचे आहेत. जगभरातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत त्यांचे नाव आदराने घेतले जाते. त्यांनीच माझ्या मृत्यूनंतर माझ्या संपत्तीचे नेमके काय होणार? याबाबत सांगितले आहे. 


वॉरेन बफेट यांनी आपल्या मृत्यूपत्रात नुकतेच काही बदल केले आहेत. माझ्या मृत्यूनंतर बिल अँड मिलिंडा गेट्स फाऊंडेशनला दान दिली जाणारी संपत्ती बंद करावी. तसेच संपत्तीसाठी माझ्या तीन मुलांनी एक ट्रस्टची स्थापना करावी. या ट्रस्टच्या माध्यमातून समाजसेवेचे काम करावे, असे बफेट यांनी आपल्या मृत्यूपत्रात म्हटले आहे. या ट्रस्टचे कामकाज बफेट यांच्या मुलांकडेच असेल. 


2006 साली अर्धे शेअर्स केले होते दान 


वॉरेन बफेट (Warren Buffett) यांच्या बर्कशायर हॅथवे ग्रुपचे बाजार भांडवल 880 अब्ज डॉलर्स आहे. या समूहाकडून कार इन्शुरन्सपासून अनेक वेगेवगळे उद्योग केले जातात. बफेट हॅथवे ग्रुपचे अध्यक्ष आहेत. या कंपनीचे एकूण 14.5 टक्के शेअर्स बफेट यांच्याकडे आहेत. त्यांनी 2006 साली त्यांच्याकडे असलेल्या अर्ध्यापेक्षा अधिक समभाग दान केले होते.


जगातील श्रीमंतांमध्ये बफेट 10 व्या स्थानी 


93 वर्षीय वॉरेन बफेट हे जगातील 10 क्रमांकाचे सर्वाधिक श्रीमंत आहेत. फोर्ब्सनुसार त्यांची 129 अब्ज डॉलर्स म्हणजेच साधारण 10,00,000 कोटींपेक्षा अधिक संपत्ती आहे. माझ्या मृत्यूनंतर बिल अँड मिलिंडा गेट्स फाऊंडेशनला दिले जाणारे दान थांबवावे, असे बफेट यांनी स्पष्टपणे म्हटले आहे. बफेट यांनी बर्कशायर हॅथवे कंपनीचे 5.3 अब्ज डॉलर्स किमतीचे शेअर्स या फाउंडेशनला दान केले होते. मनी कंट्रोल या संकेतस्थळावरील माहितीनुसार बफेट यांनी आतापर्यंत 57 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक संपत्ती दान केलेली आहे. 


धर्मादाय कामांसाठी खर्च केले जाणार पैसे 


वॉरेन बफेट यांनी आपल्या मृत्यूपत्रात एक ट्रस्टची स्थापना करण्याचे सांगितले सांगितले. बफेट यांची मुलं या ट्रस्टची स्थापना करतील. त्यांच्या मुलांना संपत्तीतील पैसे धर्मादाय कामासाठी खर्च करावे लागणार आहेत. पण याबाबत कोणतेही लिखित स्वरुपात आदेश नाही. मिळालेल्या माहितीनुसार लहान मुलं, वयोवृद्ध, गरजू लोकांसाठी या संपत्तीचा वापर केला जाणार आहे. 


हेही वाचा :


लवकरच येणार 'हे' दोन तगडे आयपीओ! गुंतवणुकीसाठी राहा तयार; पैशांचा पडू शकतो पाऊस?


फक्त 'या' एका सरकारी योजनेत गुंतवा पैसे, तुमची मुलगी होणार लखपती; पैसे बुडण्याचाही नाही धोका!


मोठी बातमी! फरार विजय माल्याच्या अडचणी वाढल्या, मुंबई सत्र न्यायालयाने दिला मोठा निर्णय