France vs Belgium : यूरो कपच्या उपांत्यपूर्व फेरीत फ्रान्सनं अटीतटीच्या लढतीत बेल्जियमवर 1-0 असा विजय मिळवत प्रवेश केला आहे. फ्रान्सपूर्वी उपांत्यपूर्व फेरीत स्पेन , जर्मनी, इंग्लंड , स्वित्झर्लंड, पोर्तुगाल या संघांनी प्रवेश केलेला आहे. उपांत्यपूर्व फेरीत आता फ्रान्स आणि पोर्तुगाल यांच्यात लढत होईल. याशिवाय  स्पेन विरुद्ध जर्मनी, इंग्लंड विरुद्ध स्वित्झरलँड यांच्यासह आणखी दोन संघांमध्ये लढती होती. यूरो कपच्या राऊंड 16 मधून फ्रान्सनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला असून आतापर्यंत 6 संघ निश्चित झाले आहेत. फ्रान्सनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला याला कारण ठरला तो बेल्जियमचा डिफेंडर जॅन व्हर्टोंघेन यानं केलेला आत्मघातकी गोल होय. 


बेल्जियमचा डिफेंडर जॅन व्हर्टोंघेन यानं केलेल्या एका सेल्फ गोलनं संघाला यूरो कपमधून बाहेर पडावं लागलं. तर फ्रान्सनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. 


फ्रान्सनं त्यांच्या राऊंड  16 च्या शेवटच्या लढतीत  दमदार कामगिरी करत मॅचवर वर्चस्व ठेवण्याचा प्रयत्न केला. पाच मिनिटांचा अवधी राहिलेला असताना जॅन व्हर्टोंघेन यानं आत्मघातकी गोल केला अन् फ्रान्सनं विजयाच्यादिशेनं पाऊल टाकलं. 


फ्रान्सचा सब्स्टिट्यूट रंदाल कलो मुआनी यानं बेल्जियमच्या पेनल्टी एरियात बॉल पोहोचवला.  त्यानं गोल पोस्टकडे बॉल मारण्याच्या प्रयत्न केला पण त्याचवेळी जॅन व्हर्टोंघेननं बेल्जियमचा गोलकीपर कोईन कॅस्टीलच्या दिशेनं बॉल मारला मात्र त्याला रोखता आला नाही अन्  फ्रान्सला एक गोलची आघाडी मिळाली. 



फ्रान्सला कामगिरी सुधारावी लागणार


एमबाप्पेच्या फ्रान्सला उपांत्यपूर्वी फेरीत आता पोर्तुगाल विरुद्ध लढावं लागणार आहे. फ्रान्सला इतर संघांच्या चुकांचा फायदा झालेला आहे. त्यांना स्पर्धेतील पहिल्या चार सामन्यात दमदार कामगिरी करता आलेली नाही. एमबाप्पेनं  पोलंडविरुद्ध एक गोल केला. दुसऱ्य दोन मॅचेसमध्ये त्यांना विरोधी संघांनी केलेल्या सेल्फ गोलचा फायदा झाला.  


बेल्जियमचा कॅप्टन केविन डी ब्रुईन यानं आम्ही योजनाबद्ध खेळत होतो. फ्रान्सचा संघ तगडा आहे हे माहिती होतं. आम्ही ज्या प्रमाणं सेल्फ गोल केला ते लाजिरवाणं होतं, असं म्हटलं. 


2018 च्या फिफा वर्ल्ड कपमध्ये फ्रान्सनं बेल्जियमला 1-0 नं पराभूत केलं होतं. बेल्जियमला त्याचा वचपा काढायचा होता. मात्र, त्यांना यश आलं नाही. यूरो कप सुरु झाला तेव्हा फ्रान्सला विजेतेपदाचं दावेदार मानलं जातं होतं. आता मात्र, जर्मनीचा संघ प्रबळ दावेदार मानला जातोय. उपांत्यपूर्व फेरीत फ्रान्स पोर्तुगालचा सामना कसा करणार हे पाहावं लागेल. 


संबंधित बातम्या : 


EURO 2024: यूरो कपमध्ये जॉर्जियाने इतिहास रचला; पोर्तुगालचा 2-0 ने केला पराभव