मुंबई : भारतातील कित्येक बँकांचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज बुडवून विदेशात पळून गेलेल्या विजय माल्याच्या अडचणी वाढल्या आहेत. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टाने त्याच्याविरोधात अजामीनपत्र वॉरंट जारी केलं आहे. इंडियन ओव्हरसीज बँकचं 180 कोटींचं कर्ज बुडवल्याप्रकरणी कोर्टाने ही कारवाई केली आहे. दरम्यान, न्यायालयाच्या या निर्णयामुळे विजय माल्याच्या (Vijay Mallya) अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या कारवाईनंतर त्याच्याविरोधातील फास आणखी आवळण्यात आल्याचे म्हटले जात आहे. 


नेमकं प्रकरण काय? न्यायालयाने काय निर्णय दिला? 


विजय माल्यावर बँकांचे कोट्यवधी रुपये बुडवल्याचा आरोप आहे. याच बँकांमध्ये इंडियन ओव्हरसीज या बँकेचाही समावेश आहे. माल्याने या बँकेचे 180 कोटी रुपये बुडवल्याचा दावा केला जातो. याप्रकरणी त्याच्याविरोधात खटला चालू आहे. या बँकेने किंगफिशर एअरलाईन्सला साल 2007 ते 2012 दरम्यान हे कर्ज दिले होते. पण माल्याने दिलेल्या कर्जाची परतफेडच केलेली नाही. याच प्रकरणी न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.


कठोर कारवाईची गरज


माल्याने बँकेने कर्जाच्या रुपात दिलेली रक्कम इतर कामांत वापरल्याचा ठपका न्यायालायाने ठेवला आहे. तसेच बँकेताल सर्वसामान्यांचा पैसा अश्याप्रकारे बुडवणाऱ्या फरार आरोपीविरोधात कठोर कारवाईची गरज आहे, असे मतही विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस.पी. नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केली आहे. न्यायालयाच्या या भूमिकेनंतर आता माल्याच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. 


2016 भारतातून विदेशात गेला


विजय माल्या सध्या फरार आहे. तो परदेशात राहतो. गेल्या अनेक दिवसांपासून भारताच्या वेगवेगळ्या तपास संस्थांकडून त्याला भारतात परत आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याच्याविरोधात बँका न्यायालयीन लढाईही लढत आहेत. पण अद्याप त्याला भारतात आणण्यात यश आलेले नाही. त्याने बँकांचे शेकडो कोटी रुपये बुडवलेले आहेत. कधीकाळी त्याला भारतात लिक्विअर किंग म्हटले जायचे. 2016 भारतातून विदेशात गेला होता. 


विजय माल्याच्या मुलाचे लग्न


दरम्यान, नुकतेच विजय माल्याचा मुलगा सिद्धार्थ माल्याने लग्न केले आहे. दीर्घकाळापासून गर्लफ्रेंड असलेल्या जॅस्मीनसोबत त्याने विवाह केलेला आहे. आपल्या या लग्नाचे काही फोटो त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यातील काही फोटोंमध्ये विजय माल्यादेखील आहे. मुलाच्या लग्नात तो आनंदी असल्याचे पाहायला मिळतेय.


हेही वाचा :


उशिरा ITR भरला तरी दंड लागणार नाही, 'या' लोकांना मिळते विशेष सूट!


लवकरच येणार 'हे' दोन तगडे आयपीओ! गुंतवणुकीसाठी राहा तयार; पैशांचा पडू शकतो पाऊस?


फक्त 'या' एका सरकारी योजनेत गुंतवा पैसे, तुमची मुलगी होणार लखपती; पैसे बुडण्याचाही नाही धोका!