मुंबई ; एसआयपी म्हणजे Systematic Investment Plan हा गुंतवणुकीचा प्रकार आजघडीला चांगलाच प्रसिद्ध आहे. एसआयपीच्या माध्यमातून म्युच्यूअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांची संघ्या दिवसेंदिवस वाडत आहेत. त्यामुळे एसआयपी नेमकं काम कसं करते? यात चक्रवाढ व्याजाची भूमिका काय आहे? तुमच्या पैशांचे मूल्य नेमके कसे वाढते? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ या. 


SIP नेमकं काम कसं करते?


SIP एक Recurring Investment प्रमाणे काम करेत. यात तुमच्या बँक खात्यातून प्रत्येक महिन्याला तुम्ही ठरवून दिलेले पैसे कट होतात. हे पैसे तुम्ही निवडलेल्या म्युच्यूअल फंडात गुंतवले जातात. तुमचे पैसे एखाद्या फंडात गुंतवले गेल्यास त्याच्या बदल्यात तुम्हाला संबंधित फंडाचे काही यूनिट्स मिळतात. तुमच्या फंडाची त्या दिवशी नेट असेट व्हॅल्यू किती आहे? यावरून तुम्ही गुंतवलेल्या पैशांच्या बदलात तुम्हाला किती यूनिट्स मिळणार हे ठरवले जाते. 


असा होतो गुंतवणुकीवर फायदा? 


समजा तुम्ही एखाद्या म्युच्यूअल फंडात 1000 रुपयांची गुंतवणूक केलेली असेल आणि त्या फंडाची NAV म्हणजेच Net Asset Value 20 रुपये आहे. तर तुम्हाला त्या महिन्यासाठी एकूण 50 यूनिट्स दिले जातात. जशी-जशी त्या म्युच्यूअल फंडाची नेट असेट व्हॅल्यू वाढेल, तसे तसे तुम्ही गुंतवलेल्या पैशांचे मूल्यदेखील वाढत राहील. समजा तुम्ही गुंतवलेल्या म्‍युच्यूअल फंडांची NAV 35 रुपये झाली तर तुम्हाला 1000 रुपयांत मिळालेल्या 50 यूनिट्सचे मूल्य हे 1750 रुपये होईल.


कॉस्‍ट अॅव्हरेजिंगचा फायदा कसा होतो? 


SIP च्या माध्यमातून तुम्ही जमा केलेल्या पैशांच्या रुपात तुम्हाला यूनिट्स दिले जातात. जेव्हा शेअर बाजारात तेजी असते तेव्हा तुम्हाला कमी यूनिट्स मिळतात. आणि जेव्हा बाजार घसरलेला असतो तेव्हा तुम्हाला मिळालेल्या यूनिट्सची संख्या जास्त असते. म्हणजेच तुमची गुंतवणूक ही सरासरीच्या भावाने होत असते. यालाच शेअर बाजाराच्या भाषेत रुपी कॉस्ट अॅव्हरेजिंग म्हणतात.


चक्रवाढ व्याजाचा फायदा काय?


तुम्ही करत असलेल्या SIP वर तुम्हाला चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळतो. म्हणजेच तुम्ही गुंतवलेल्या मूळ रकमेवर तसेच तुम्ही गुंतवलेल्या रकमेवर मिळालेल्या व्याजावरही तुम्हाला व्याज मिळते. त्यामुळेच तुम्हाला चक्रवाढ व्याजाच्या मदतीने चांगला फायदा होतो. SIP च्या माध्यमातून गुंतवलेल्या पैशावर साधारण 12 टक्क्यांनी रिटर्न्स मिळतात, असे म्हटले जाते. अनेकदा यापेक्षाही अधिक रिटर्न्स मिळू शकतात. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार एसआयपीमध्ये तुम्ही दीर्घकालीन गुंतवणूक केली पाहिजे. ज्याचा फायदा तुलनेने अधिक होतो. SIP वर गुंतवलेल्या पैशांवरचा रिटर्न हा शेअर मार्केटच्या स्थितीवर अवलंबून असतो. त्यामुळे यात परताव्याची हमी दिली जात नाही. 


सोईनुसार गुंतवणूक, सोईनुसार पैसे काढता येतात 


एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणुकीचा कालावधी तसेच गुंतवणुकीसाठीची रक्कम यासाठी फारसे कठोर नियम नाहीत. इतर प्रकारच्या गुंतवणुकीत तुम्हाला अशा प्रकारची सोय ाही. तुम्ही मासिक, तिमाही, वर्ष असा कालावधी निवडून गुंतवणूक करू शकता. विशेष म्हणजे तुम्ही अडचणीत असाल तर एसआयपी थांबवूही शकता. विशेष म्हणजे जिथे एसआयपी थांबवलेली आहे, तेथूनच तुम्हाला एसआयपी चालूही करता येते. एसआयपीमध्ये लॉक-इनची अडचण नसते. तुम्हाला जेव्हा हवे तेव्हा पैसे काढता येतात. काही काही म्युच्यूअल फंड्सना लॉक-इन पिरियड असतो. एसआयपीची रक्कम गरजेनुसार कमी-अधिक करता येते. याच एसआयपीला टॉपअप करता येते. 


हेही वाचा :


15000 चे झाले 32000 ! थेट पैसे दुप्पट, बजाज हाऊसिंग फायनान्सच्या IPO मुळे हजारो गुंतवणूकदार श्रीमंत


UPI व्यवहाराबाबत नवा नियम, आता 500000 रुपयांपर्यंत करता येणार डिजिटल पेमेंट!