What is GPF Vs EPF Vs PPF : कमाईचा अथवा पगाराचा काही हिस्सा तरी आपण महिन्याला बचत करावा, त्या बचतीत शिस्त यावी आणि आपली बचत सुरक्षित राहावी अशी सामान्य नोकरदाराची, छोट्या मोठ्या गुंतवणुकदाराची किंवा छोट्या मोठ्या उद्योजकाची अपेक्षा असते. अशावेळी सरकारी आणि खासगी कर्मचाऱ्यांचा ओढा साहजिकच सरकारी बचत योजनांकडे असतो. त्यातही ईपीएफ (EPF), पीपीएफ (PPF) आणि जीपीएफ (GPF) हे पैसे गुंतवण्याचा पर्याय सतत कानावर येत असतात. पण ईपीएफ, पीपीएफ आणि जीपीएफ म्हणजे नेमकं काय...

GPF म्हणजे जनरल प्रॉव्हिडंट फंड जो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी असतो. EPF म्हणजे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, जो खाजगी संस्थामधील कर्मचाऱ्यांसाठी असतो.  PPF म्हणजे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी जो सर्वांसाठी खुला असतो. ईपीएफ, पीपीएफ आणि जीपीएफ यातील फरक काय आहे, याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.. 

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजे काय? What is PPF (Public Provident Fund)?

पीपीएफ ही सरकारची छोटी बचत योजना आहे. ही योजना सर्वसामान्यांसाठी आहे. त्यात खाते उघडून कोणीही पैसे जमा करू शकतो. हा एक प्रकारचा बचत निधी आहे. तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा बँकांमध्ये पीपीएफ खाते उघडू शकता. तुम्हाला पीपीएफ खात्यात दरवर्षी किमान 500 रुपये जमा करावे लागतील. प्रत्येक आर्थिक वर्षात पीपीएफ खात्यात पैसे भरावेच लागतात. तरच खाते चालू राहते.रोख, चेक, पोस्टल ऑर्डर, डिमांड ड्राफ्ट, ऑनलाइन हस्तांतरण, एकदाच पैसे भरणे किंवा दरमहिना पैसे भरणे अशा स्वरूपांत पैसे भरता येतात. 

फायदे काय? PPF Benefits


केंद्र सरकारचा पाठिंबा असल्याने पीपीएफ खात्यातील रक्कम बुडण्याची भीती नसते.
पीपीएफ खाते पोस्ट ऑफिस, राष्ट्रीयकृत बँका, निवडक खासगी बँका येथे उघडता येते.
या खात्यात जमा केलेल्या रकमेवर आयकर कायद्याच्या कलम 80 C (Income Tax Act of 1961) अंतर्गत आयकर कपातीचा लाभ मिळतो. 
खात्यात दरवर्षी किमान 500 रुपये आणि कमाल 1.50 लाख रुपये भरु शकता.  
खाते उघडल्यापासून सातव्या वर्षानंतर मुदतपूर्व पैसे काढण्याची परवानगी मिळते. अथवा त्या रक्कमेवर कर्जही मिळते.
कोणत्याही उत्पन्न गटातील व्यक्तीला हे खाते उघडता येते. 
 

सामान्य भविष्य निर्वाह निधी - What is GPF (General Provident Fund)?

जीपीएफ ही पपीएफ (PPF) सारखीच एक योजना आहे, ज्यामध्ये फक्त सरकारी कर्मचारीच योगदान देऊ शकतात. जीपीएफ एक प्रकारचे निवृत्तीनंतर केलेले पैशासाठी नियोजन आहे. कारण, यात गुंतवणूक केलेली रक्कम कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतरच मिळते. सरकारी कर्मचारी त्यांच्या पगारातील ठरावीक रक्कम GPF खात्यात जमा करु शकतात.  सरकार जीपीएफमध्ये कोणतेही योगदान देत नसून यामधील सर्व योगदान कर्मचाऱ्याचे असते.  कर्मचारी गरज पडल्यास जीपीएफ खात्यातून निश्चित रक्कम काढू शकतो आणि नंतर जमा करू शकतो. यावरही कोणताही कर नाही. 

 

फायदे काय? GPF Benefits

आयकर कायद्याच्या कलम 80 C (Income Tax Act of 1961) अंतर्गत आयकर कपातीचा लाभ मिळतो.
सरकारी कर्मचारी एका आर्थिक वर्षात जीपीएफमध्ये फक्त 5 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करू शकतात.
अर्थ मंत्रालय दर तिमाहीत जीपीएफच्या व्याजदरात बदल करतं
GPF खातेदाराचा मृत्यू झाल्यास वारसदार GPF निकषांनुसार अतिरिक्त पेमेंटसाठी पात्र ठरतो. जर एखाद्या कर्मचाऱ्याने त्याच्या मृत्यूच्या वेळी किमान 5 वर्षे काम केले असेल तरच हा लाभ मिळतो.  

 

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी What is EPF (Employee Provident Fund)?

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये अशा कंपन्यांचा समावेश होतो जेथे 20 पेक्षा जास्त कर्मचारी काम करतात. म्हणजे पगारदार वर्गासाठी ईपीएफ खातं उघडलं जातं. यामध्ये खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेद्वारे (EPFO) खाते नियंत्रित केलं जातं. प्रत्येक कर्मचाऱ्याचे स्वतःचे भविष्य निर्वाह निधी खाते आहे. यामध्ये कर्मचाऱ्याच्या पगाराचा 12 टक्के भाग या खात्यात जपा होता, तसेच तितकीच रक्कम कंपनीही जमा करते. ईपीएफ वरील व्याजाची गणना वार्षिक आधारावर केली जाते. सध्या 8.10 टक्के व्याज मिळते.  कामगार मंत्रालयाने हे सूचित केले आहे.

 

फायदे काय? EPF Benefits

खासगी कंपनीत काम करणाऱ्यांसाठी दीर्घकालीन आर्थिक नियोजनात मदत होते. 
नियमितपणे कर्मचार्‍यांचे पगार कापले जातात, त्यामुळे मोठ्या प्रमाणात पैसे वाचवता येतात. निवृत्तीनंतर याचा मोठ्या प्रमाणात फायदा होतो. 
आपत्कालीन परिस्थिती असल्यास पीएफ खात्यामधून पैसे काढता येतात. 

Difference between PPF, GPF, and EPF : Detail Comparation between PPF, GPF, and EPF

Particulars

PPF

GPF

EPF

Full-Form

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी

Public Provident Fund

सामान्य भविष्य निर्वाह निधी

General Provident Fund

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी

Employee Provident Fund

Eligibility Criteria

18 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच खाते उघडता येते

फक्त सरकारी नोकरदारांसाठी 

खासगी कर्मचाऱ्यांसाठी

Interest Rate Applicable

7.10%

7.10%

8.10%

Time Period

15 वर्षानंतरच मॅच्युअर होतेे

सरकारी नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर

58 वर्षानंतर

Premature Period for the Scheme

पाच वर्षानंतर योग्य कारण असल्यास रक्कम काढू शकतात. जसे की, वैद्यकीय किंवा शैक्षणिक.

नोकरी सोडल्यानंरच

नोकरी सोडल्यानंतर दोन महिन्यात रक्कम काढता येते. 

PPF Vs GPF Vs EPF

Loan Eligibility Criteria

खाते उघडल्यानंतर तिसर्‍या आणि सहाव्या आर्थिक वर्षात पीपीएफ (PPF) फंडावर कर्ज उपलब्ध होते. पीपीएफ खात्यात जमा केलेल्या रकमेच्या 25 % पर्यंत कर्ज मिळते.

सात वर्षांच्या सेवेनंतर, एखादा कर्मचारी त्याच्या EPF खात्यात विवाह आणि शिक्षणासाठी ठेवलेल्या रकमेच्या 50% पर्यंत कर्ज घेऊ शकतो. 10 वर्षांच्या सेवेनंतर, तो त्याच्या EPF खात्यात ठेवलेल्या रकमेच्या 90% पर्यंत कर्ज घेऊ शकतो.  

एक सरकारी कर्मचारी त्याच्या GPF निधीतून त्याच्या संपूर्ण नोकरीत कधीही कर्ज घेऊ शकतो.

Tax Exemption Rule

जर एखाद्या कर्मचाऱ्याने पाच वर्षांनंतर त्याच्या EPF खात्यातून उर्वरित रक्कम काढली तर ती रक्कम करमुक्त असते.

GPF ही करमुक्त सेवानिवृत्ती बचत योजना आहे.

आयकर कायद्याच्या कलम 80 C (Income Tax Act of 1961) अंतर्गत आयकर कपातीचा लाभ मिळतो. प्रत्येक वर्षाला 1.5 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करमुक्त असेल.