मुंबई : आपत्कालीन स्थितीत, पैशांची गरज असल्यावर अनेकजण पर्सनल लोनचा (वैयक्तिक कर्ज) (Personal Loan) पर्याय निवडतात. या वैयक्तिक कर्जाचा व्याजदर मोठा असतो. त्यामुळे अशा प्रकारचे कर्ज घेताना योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. घाई-गडबडीत पर्सनल लोन घेतल्यास ऐन वेळी अडचणींचा सामना करावा लागतो. पर्सनल लोनचे अनेक प्रकार असतात. काहीजण तुम्हाला इन्स्टन्ट लोन (Instant Personal Loan) देतात तर काही जण क्रेडिट कार्डच्या मार्फत पर्सनल लोन देतात. मात्र या प्रत्येक लोनसाठी वेगवेगळ्या अटी असतात. याच पार्श्वभूमीवर लोन घेतल्यानंतर आर्थिक अडचण होऊ नये. कर्जाच्या विळख्यात अडकू नये, यासाठी काय करावे? हे जाणून घेऊ या.. 


अगोदर सीबील स्कोअर जाणून घ्या


तुमचा सीबील स्कोअर चांगल्यास कमी व्याजदारात कर्ज मिळण्याची शक्यता जास्त असते. सीबील स्कोअर चांगला नसेल तर कर्ज मंजुरीसाठी तम्हाला अडचण येऊ शकते. सीबीली स्कोअरच्या माध्यमातून तुमची क्रेडिट हिस्ट्री आणि क्रेडिट प्रोफाईल याची माहिती मिळते. त्यामुळे पर्सनल लोन घेण्याआधी सीबील स्कोअर जाणून घ्या.  


तुम्ही कर्ज फेडू शकता का? 


पर्सनल लोन घेण्याआधी तुम्ही तुमच्या आर्थिक स्थितीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तुमचे उत्पन्न काय आणि किती आहे. पर्सनल लोन काढल्यास ते फेडणे शक्य होईल का, याची चाचपणी केली पाहिजे. बँकदेखील या सर्व गोष्टींची चाचपणी करते. तुमचा पगार किती आहे? यावरूनच किती लोन द्यायचे हे बँक ठऱवते.  


व्याजदर किती हे जाणून घ्या 


पर्सनल लोनला व्याजदर जास्त असतो. ते घेण्याआधी कोणती बँक पर्सनल लोनवर किती व्याज आकारते आहे, हे जाणून घ्या. त्यासाठी चार ते पाच बँकांशी संपर्क साधा. सर्वांत कमी व्याजदर असणाऱ्या बँकेकडूनच तुम्ही कर्ज घ्यायला हवे. 


लोन प्रिमेंटची सोय आहे का? हे जाणून घ्या


पर्सनल लोन घेण्याआधी लोन-प्रिमेंटच्या शर्थीविषयी जाणून घेणे गरजेचे आहे. अनेक बँका आणि नॉन -ऑपरेटिव्ह फायनॅन्शीयल होल्डिंग कंपन्या प्रिमेंटसाठी वेगळी फी आकारतात. बँक तुम्हाला लोन देते. त्यावर काही व्याज आकारते. हेच व्याज बँकेचे उत्पन्न असते. तुम्ही प्रिमेंटच्या माध्यमातून पैसे देण्याचे ठरवल्यास बँकेला व्याज मिळत नाही. परिणामी बँका काही फी आकारून आपला फायदा काढून घेतात. त्यामुळे बँका प्रिमेंटसाठी काय सुविधा आहे? काय अटी आहेत? हे जाणून घेतले पाहिजे.  


फ्लेक्झिबल इएमआयचा ऑप्शन आहे का? 


पर्सनल लोन घेत असाल तर ईएमआय काय असेल हे अगोदर जाणून घ्यायला हवे. तसेच फ्लेक्झिबल ईएमआयचा ऑप्शन आहे का? हेही तपासून पाहावे. काही बँका या स्टँडर्ड ईएमआय तसेच फ्लेक्झिबल ईएमआयचा ऑप्शन देतात. फ्लेक्झिबल ईएमआयमुळे कर्ज फेडणे सोपे होते. यामध्ये अगोदर काही काळासाठी ईएमआय कमी असतो. नंतर तो हळूहळू वाढत जातो. 


कमी कालावधीसाठी कर्ज घ्या 


पर्सनल लोन घेताना परतफेडीचा कालावधी कमी असायला हवा, याची खबरदारी घ्यायला हवी. कारण परतफेडीचा कालावधी जेवढा जास्त तेवढे जास्त व्याज तुम्हाला द्यावे लागेल. परतफेडीचा कालावधी कमी असला तर तुमचे जास्त व्याज जाणार नाही. त्यामुळे परतफेडीचा कालावधी कमी कसा राहील याची काळजी घेतली पाहिजे.  


हेही वाचा :


अक्षय्य तृतीया दोन दिवसांवर असताना सोनं पुन्हा महागलं, जाणून घ्या आजचा भाव काय?


कॅप्टन कुलची 'ई- मोटोरॅड'मध्ये मोठी गुंतवणूक, पण ही कंपनी नेमकं करते तरी काय?


'या' कंपनीत पैसे गुंतवा अन् व्हा मालामाल, एका महिन्यात दिलेत तब्बल 582 टक्क्यांनी रिटर्न्स