Salary Slip : जर तुम्हाला नवीन नोकरी (Job) लागली असेल, तर पगारानंतर तुम्हाला सॅलरी स्लिप (Salary Slip) मिळते. या सॅलरी स्लिपमध्ये तुमच्या पगाराशी संबंधित संपूर्ण माहिती देण्यात आलेली असते. तुम्ही जॉब बदलता तेव्हा तुमची सॅलरी स्लिपसुद्धा दुसऱ्या कंपनीत विचारली जाते. कारण त्याच आधारावर तुमचे पॅकेज ठरवले जाते. मूळ वेतनाव्यतिरिक्त, अनेक प्रकारचे भत्ते सॅलरी स्लिपमध्ये असतात. तुमच्या पगाराच्या स्लिपमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश असतो? किंवा नोकरी मिळाल्ानंतर तुम्ही काही गोष्टी समजून घेणं गरजेचं असतं. 


मूळ वेतन


सॅलरी स्लिपमधील सर्वात महत्त्वाचा भाग हा तुमचा मूळ पगार. कारण तुम्हाला सर्व फायदे फक्त मूळ पगाराच्या आधारावर दिले जातात. मूळ पगार तुमच्या एकूण पगाराच्या 35 ते 50 टक्के असू शकतो. हा पैसा करपात्र आहे.


घर भाडे भत्ता


घरभाडे भत्ता तुमच्या मूळ वेतनानुसारच दिला जातो. तुम्हाला तुमच्या मूळ पगाराच्या 40 ते 50 टक्के रक्कम HRA म्हणून दिली जाऊ शकते. हा सॅलरी स्लिपचा एक प्रमुख करपात्र घटक आहे.


महागाई भत्ता


तुमच्या मूळ पगारानुसार महागाई भत्ता बदलतो. पण महागाई भत्ता 50 टक्क्यांपर्यंत पोहोचताच तो शून्यावर आणला जातो. कर्मचाऱ्यांना 50 टक्क्यांप्रमाणे भत्ता मिळणार होता तो मूळ पगारात म्हणजेच किमान पगारात जोडला जातो.


वाहतूक भत्ता


तुम्ही कंपनीच्या काही कामासाठी प्रवास करता तेव्हा कंपनी तुम्हाला वाहतूक भत्ता देते. यामध्ये तुम्ही जे पैसे खर्च करता ते तुम्हाला तुमच्या कॅश इन हॅन्ड सॅलरीमध्ये जोडून मिळतात. याचा अर्थ असा की जर तुम्हाला 1,600 रुपयांपर्यंत कन्व्हेयन्स अलाउंस मिळत असेल तर तुम्हाला त्यावर कर भरावा लागणार नाही.


रजा प्रवास भत्ता


रजा प्रवास भत्ता ज्याला अनेकदा LTA म्हणतात. LTA अंतर्गत, कंपन्या कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना देशात कुठेतरी प्रवास करताना झालेल्या खर्चाची परतफेड करतात. LTA मध्ये मिळालेले पैसे करमुक्त आहेत. रजा प्रवास भत्त्याची रक्कम तुमच्या रँक आणि पोस्टनुसार तुमच्या कंपनीच्या HR आणि वित्त विभागाद्वारे ठरवली जाते.


वैद्यकीय भत्ता


कर्मचाऱ्याला सेवेदरम्यान वैद्यकीय खर्चासाठी देय म्हणून वैद्यकीय भत्ता देण्यात येतो. पण तुम्हाला हा भत्ता बिलाच्या बदल्यात मिळतो. म्हणजे तुम्हाला तुमच्या वैद्यकीय खर्चाची पावती पुरावा म्हणून द्यावी लागेल. कराच्या दृष्टिकोनातून, 15,000 रुपयांची वार्षिक वैद्यकीय बिले करमुक्त आहेत.


विशेष भत्ता


विशेष भत्ता हा एक प्रकारचा पुरस्कार आहे, जो कर्मचाऱ्यांना प्रेरित करण्यासाठी दिला जातो. परंतु सर्व कंपन्यांची कार्यप्रदर्शन धोरणे वेगळी असतात. तर तो पूर्णपणे करपात्र आहे.


कामगिरी बोनस


व्हेरिएबल पे आणि परफॉर्मन्स बोनस कर्मचाऱ्यांच्या कामाच्या कामगिरीवर अवलंबून असतात. कंपनीत काम करताना तुमच्या कामगिरीच्या आधारावर तुम्हाला मासिक, त्रैमासिक आणि वार्षिक बोनस किंवा टार्गेट व्हेरिएबल्सवर पैसे दिले जातात. तुम्हाला किती बोनस द्यायचा हे नियोक्ता ठरवतो.


भविष्य निर्वाह निधी


तुमच्या पगारातून दरमहा भविष्य निर्वाह निधी कापला जातो. हे तुमच्या मूळ वेतनाच्या आणि डीएच्या 12 टक्के आहे. याशिवाय, एम्प्लॉयरकडून हीच रक्कम तुमच्या खात्यात जमा केली जाते.


व्यावसायिक कर


यामध्ये तुमच्या पगारातील काही भाग तुमच्या टॅक्स स्लॅबनुसार कापला जातो. हा अप्रत्यक्ष कर आहे. हे फक्त कर्नाटक, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात, आसाम, छत्तीसगड, केरळ, मेघालय, ओडिशा, त्रिपुरा, झारखंड, बिहार आणि मध्य प्रदेशमध्ये वैध आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


आईकडून 10,000 रुपये घेऊन व्यवसायाची सुरुवात, आज 20000 कोटींची संपत्ती; मोदींचा 'मान्यवर'ब्रँड प्रसिद्ध