मुंबई : पर्सनल लोनला (Personal Loan) इमर्जन्सी लोनदेखील म्हटलं जातं.  हे कर्ज अगदी सहज मिळते. यासाठी बँका तुम्हाल कोणत्याही कोलॅटरलची मागणी करत नाहीत. विशेष म्हणजे हे कर्ज फेडण्यासाठी बँकांकडून पुरेसा वेळ दिला जातो. त्यामुळेच अनेकजण हे कर्ज काढून महत्त्वाची कामे करतात. तुमचा सीबील स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला बँका सहज हे लोन देतात. पण पर्सनल लोनवर व्याजदर फार असतो. हे कर्ज अनसेक्यअर्ड प्रकारात मोडते. त्यामुळेच यावर मोठे व्याज आकारले जाते. पर्सनल लोनमधून मिळालेल्या पैशांचा योग्य ठिकाणी वापर होणे गरजेचे आहे. ते अन्य ठिकाणी वापरल्यास मोठा तोटा होऊ शकतो. तुम्ही कर्जाच्या विळख्यात अडकू शकता. याच पार्श्वभूमीवर पर्सनल लोन कोणत्या तीन ठिकाणी वापरून नये हे जाणून घेऊ या. 


शेअर खरेदी करण्यासाठी 


शेअर मार्केट हे असे क्षेत्र आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही खूप सारे पैसे कमवू शकता. मात्र याच शेअर मार्केटमध्ये एका झटक्यात तुमचे पैसे बुडूदेखील शकतात. त्यामुळेच पर्सनल लोनमधून मिळालेले पैसे शेअर बाजारात गुंतवू नये. अचानक शेअर बाजार गडगडला तर तुमचे पैसे बुडू शकतात. विशेष म्हणजे शेअर बाजारात तुमचे पैसे बुडाले तरी पर्सनल लोन देणाऱ्या बँका तुमचा व्याजदर कमी करत नाहीत. तुम्हाला त्या कर्जाची परतफेड करावीच लागते. त्यामुळे पर्सनल लोनचे पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवू नये. नाहीतर कर्जाच्या विळख्यात अडकण्याची शक्यता अधिक असते. 


महागड्या वस्तू खरेदी करू नये 


पर्सनल लोनवर व्याजदर फार असतो. त्यामुळ फार गरज असेल तरच हे कर्ज काढायला हवे. महत्त्वाच्या कामासाठी अन्य कोणताही पर्याय शिल्लक नसल्यावरच या लोनचा विचार करावा. विशेष म्हणजे पर्सनल लोन काढून महागड्या, चैनीच्या वस्तू खरेदी करू नयेत. मोबाईल, फ्रीज, टीव्ही अशा प्रकारच्या वस्तू पर्सनल लोनच्या पैशांतून खरेदी करू नयेत. तुमची कमाई जेवढी आहे, त्याचा विचार करूनच चौनीच्या वस्तू खरेदी कराव्यात. अन्यथा तुम्ही कर्जाच्या विळख्यात अडकू शकता.


कर्ज फेडण्यासाठी पर्सनल लोन काढू नये 


अनेकजण अन्य कर्ज फेडण्यासाठी पर्सनल लोन काढतात. एक कर्ज फेडण्यासाठी दुसरे कर्ज काढणे हे चुकीचे आहे. त्यातही पर्सनल लोन काढून अन्य कर्ज फेडल्यास तुम्ही कर्जाच्या विळख्यात अडकू शकता. कारण पर्सनल लोनवरील व्याजदर खूप असतो. त्यामुळे एक कर्ज फेडण्यासाठी दुसरे कर्ज काढून तुम्ही आणखी अडचणीत सापडू शकता.  


हेही वाचा :


SIP करताना 'ही' एक काळजी घ्या, अन्यथा मोठं नुकसान झालंच म्हणून समजा!


रॉकेटच्या वेगाने पैसे वाढणार, फक्त 15 वर्षांत व्हा करोडपती; जाणून घ्या 12-15-20 चा फॉर्म्यूला काय?


श्रीमंत व्हायचंय? मग फक्त 'या' पाच गोष्टी पाळा; संपत्ती वाढलीच म्हणून समजा!