आजच्या घडीला जी मार्केटमध्ये खास करून रिटलर्समध्ये भितीचं वातावरण पसरलंय, ते म्हणजे SME / SMALL-MICRO Cap मध्ये रोजच्या Lower Circuit मुळे..


मला याचा बऱ्यापैकी अंदाज आहे... की मार्केट मधले मोठे शार्क रिटलर्सला कधीच पैसा कामावून देत नाहीत... आणि जी आता आपण परिस्थिती अनुभवतोय, तिच प्रत्येक Decade मध्ये पहायला मिळते... फक्त रिटेलर्सला ट्रॅप करायचे मार्ग वेगळे असतात... 


आता पोर्टफोलिओ ५०% नुकसान मध्ये आहे... आपण आपल्या मनाची समजूत काढायला बोलत असतो , फंडामेंटल चांगले आहेत.  valuation मध्ये अजून strength आहे,अजून खाली आला तर अजून ऍड करेन वैगरे वैगरे, पण कॅपिटल Damage जेव्हा होत असतं, तेव्हा किती ही जरी लपवलं तरी त्याचं खरं Pain आपल्याला कळत असतं... कटू असलं तरी सत्य आहे. 


आपण स्वतःला या सर्व गोष्टींमध्ये इतके वाहून घेतो की मार्केटचे बेसिक नियम विसरून जातो... 
१) कॅपिटल प्रोटेकशनचा विचार न करणं
२) ओव्हर कॉन्फिडन्स
३)Extra- Ordinary प्रॉफिटची अपॆक्षा ठेवणं
४)falling knife मध्ये आपण मार्केट समोर तलवार घेऊन लढायला तयार राहणं.


एखादी गोष्ट रिटेलर्समध्ये पूर्ण रुजली की ती गोष्ट मार्केट मध्ये डिस्काउंट व्हायला सुरु होतेच... !! सुरवातीच्या कळात SME /SMALL-micro cap मध्ये स्मार्ट लोकांनी खूप मस्त पैसा कमावला... आपल्यातील लोकांनी देखील अचूक Analysis करून पैसा कमावला... पण ब्रॉडर स्केल वर पाहायला गेलं तर आता प्रत्येक रिटेल्सर्सच्या मनात या सेगमेंटची हवा होती... प्रत्येकाला यातून पैसा कमावायचा होता... मोठ-मोठाली स्वप्ने रंगवली जात होती. प्रत्येक जण फायनेन्सिअल गोलची पूर्तता या मधूनच करू पहात होते.. .


मी खूप आधी पासून बोलत आलोय.....  ब्लूचिप/frontline stocks मध्ये गुंतवणूक करावी,किमान कॅपिटल प्रोटेक्शन साठी तरी सोयिस्कर असतं. कितीही चांगल्या Quality चा स्टॉक असला तरी SL चा रिस्पेक्ट करणं अतिशय महत्वाचे.. कारण मी हे अनुभवलंय सीर (capital) सलामात तो पगडी(opportunities) पचास...!!


आता जर एवढ्या खाली आल्यानंतर,दुर्दैवाने lower circuit अजून ५०% पर्यंत घेऊन गेले तर आपण बघायाचे कुठे... ?? पुढच्या Quarter मधल्या Data नुसार promotes holding कमी झाली असली तर आपण करायचं काय??


मार्केट/प्रोमोटर्स कोणत्याही रिटलर्स च्या इमोशन्सना जुमानत नाहीत.... ते रिटेलर्सचा गेम करायलाच आलेत. हे कदापी नाकारता येणार नाही. कारण कितीहि झालं तरी, मार्केट हा Fear आणि Greed मधला फक्त एक दुवा आहे.


किंवा दुसऱ्या बाजूला , इथुन स्टॉक Recover जरी झाला तर आपण जे analysis केलं होतं,त्या मध्ये काहीतरी कमी असेल?? जे आपण हुडकू नाही शकलो, जेव्हा स्टॉक  वर होता ... याचाच अर्थ आपल्यापेक्षा पण स्मार्ट मार्केट आहे हे निश्चित?? म्हणजेच आज रिटलर्सला पुन्हा मार्केटने गंडवलं??


शेअर मार्केट मध्ये ही जी रक्तबंबाळ परिस्थिती सध्या आपण अनुभवतोय..ती वेळे नुसार बदलेल की नाही.. हे आता फक्त  वेळच ठरवेल..!!


लेखक - सीताराम ढेपे, शेअर बाजार विषयक घडामोडींचे अभ्यासक