Vegetable Prices : देशात सध्या लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) रणधुमाळी सुरु आहे. आत्तापर्यंत चार टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. आणखी तीन टप्प्यातील मतदान प्रक्रिया बाकी आहे.. या निवडणुकीच्या (Election) पार्श्वभूमीवर सरकार देशात महागाई (inflation) वाढू नये यासाठी प्रयत्न करत आहे. पण महागाई वाढताना दिसत आहे. सध्या भाजीपाल्यांच्या दरात मोठी वाढ झालीय. विशेषत: बटाट्याच्या दरात (Potato Price) मोठी वाढ झालीय. त्यामुळं स्वयंपाक घरातून बटाट गायब झाला आहे. 


बटाट्याबरोबरच अन्य भाज्यांच्या दरात देखील वाढ


सध्या देशात एका बाजूला उष्णतेचा कहर आहे, तर काही बाजूला अवकाळी पाऊस आहे. या हवामानाच्या स्थितीचा बटाट्याच्या उत्पादनावर देखील परिणाम झालाय. त्यामुळं बाजारात बटाट्याचे प्रमाण कमी आहे. मागणी जास्त आणि पुरवठा कमी आहे. या स्थितीमुळं बटाटाच्या दरात वाढ होताना दिसत आहे. बटाट्याबरोबरच अन्य भाज्यांच्या दरात देखील वाढ होताना दिसत आहे. 


टोमॅटोच्या दरात घट तर बटाट्याच्या दरात वाढ


दिल्लीतील आझादपूरची बाजारपेठ अशिया खंडातील सर्वात मोटी बाजारपठ आहे. या बाजारात एका बाजूला बाजारात टोमॅटोच्या दरात घसरण होत आहे. तर दुसऱ्या बाजूला बटाट्याच्या दरात वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. हिमाचल प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाबमधून आवक वाढल्याने टोमॅटोच्या दरात घट झाली आहे. तर बटाट्याचे भाव अजूनही चढेच आहेत. बटाट्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 


बटाट्याच्या दरात आणखी 5 ते 10 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता 


व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बटाट्याच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. येत्या काही दिवसांत आणखी बटाट्याच्या दरात 5 ते 10 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसामुळे बटाटा पिकाचे अनेक ठिकाणी मोठं नुकसान झालं आहे. यामुळेच बटाट्याच्या उत्पादनात घट झाली आहे. याचा परिणाम दरांवर होत आहे. सध्या बटाट्याच्या दरात वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. 


नवीन पिक बाजारात येईपर्यंत दरात वाढ कायम राहणार


दरम्यान, बटाट्याचे नवीन पीक बाजारात येईपर्यंत कमी प्रमाणात बटाटा बाजारात येत आहे. त्यामुळं दरातही वाढ होत आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, डिसेंबर महिन्यात बटाट्याचे पिक बाजारात येण्याची शक्यता आहे. त्यामुळं आणखी पाच सहा महिने बटाट्याचे दर वाढलेलेच राहतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. 


कोल्ड स्टोरेजची तपासणी सुरु 


वाढत्या किंमती रोखण्यासाठी सरकारनं हालचाली सुरु केल्या आहेत. देशात उत्तर प्रदेशात सर्वात जा्त बटाट्याचे उत्पादन होते. किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारनं कोल्ड स्टोरेजची तपासणी सुरु केली आहे. कारण व्यापाऱ्यांनी कोल्ड स्टोरेजमध्ये बटाट्याटा साठा केल्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीननंतर तपासणीच्या कामाला अधिक वेग येईल अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. दरम्यान, बटाटा आणि भाजीपाल्याच्या किमंती वाढत असल्यामुळं व्हेज थाळी महाग होत आहे. 


महत्वाच्या बातम्या:


Food Inflation: महागाईनं काळजाचा ठोका चुकवला; टॉमेटो, बटाटा, कांद्यानं वाढवलं टेन्शन, पुन्हा सर्वसामान्यांना रडवणार?