नवी दिल्ली : तुम्ही जर रिक्षात बसला आणि दहा मिनिटं फिरलात तर तुमचं भाडं किती येईल? 30, 40 रुपये किंवा जास्तीत जास्त 100 ते 200 रुपये. पण जर दहा मिनिटांच्या फेरीनंतर तुम्हाला चक्क एक कोटी रुपयांचं बिल हाती दिलं तर काय करणार? ही अतिशयोक्ती नसून बंगळुरुतील एका व्यक्तीला दहा मिनिटांच्या फेरीसाठी एक कोटींचं बिल देण्यात आलं. एवढं बिल आल्यानंतर त्या व्यक्तीला चक्कर आली ती गोष्ट वेगळीच. पण त्याची तक्रार केल्यानंतर उबेर कंपनीने (Uber Auto) त्या व्यक्तीची माफी मागितली आणि विषयावर पडदा घालण्याचा प्रयत्न केला. 


विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वी एका व्यक्तीला 7.66 कोटी रुपयांच बिल दिलं होतं. त्यानंतर ही घटना घडल्याने उबेर ऑटोचं चालतंय काय असा प्रश्न पडतोय. 


जगातील प्रसिद्ध कंपनी असलेल्या उबेरला सध्या अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. दोनच दिवसांपूर्वी नोएडाच्या एका व्यक्तीची पोस्ट व्हायरल झाली होती. त्यामध्ये त्या व्यक्तीला उबेर ऑटोने प्रवास करण्याचे 7.66 बिल देण्यात आलं होतं. या समस्येचं निवारण करण्याचं आश्वासन दिलेल्या उबेरने दोनच दिवसात पुन्हा एकदा एक कोटींचं बिल दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातंय. 


बेंगळुरुमधील एका व्यक्तीने उबेर ऑटोमधून फक्त 10 मिनिटांची राइड घेतली आणि कंपनीने त्याला 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त बिल पाठवले. उबरने माफी मागितली असून या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे.


भाडे 207 रुपयांवरून 1,03,11,055 रुपये झाले


श्रीराज नीलेश असं या व्यक्तीचं नाव असून तो मूळचा हैदराबादचा आहे आणि फिरण्याच्या निमित्ताने तो बंगळुरुमध्ये आला होता. त्यासंबंधित व्हिडीओ त्याने इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. श्रीराज निलेशने सांगितले की तो त्याच्या पत्नीसोबत होता आणि त्याने उबेर ॲपद्वारे टिन फॅक्टरी, केआर पुरम ते कोरमंगला या प्रवासासाठी त्याने ऑटो बुक केली होती. 10 मिनिटांच्या या प्रवासाचे भाडे अॅपवर 207 रुपये दाखवण्यात आले होते. 


पण अपेक्षित स्थळी पोहोचल्यानंतर पैसे भरताना त्याचे डोळे चक्रावले. QR कोडद्वारे पैसे भरताना बिल 1,03,11,055 रुपये इतके दाखवण्यात आलं. त्यानंतर त्याने कस्टमर केअरकडूनही मदत घेण्याच्या प्रयत्न केला. पण त्याला काही प्रतिसाद मिळाला नसल्याचं त्याने सांगितलं. त्यानंतर पुरावा म्हणून त्याने एक व्हिडीओ तयार केला. 


 






बिलिंगच्या प्रकरणावरून अनेकवेळा तक्रार केल्यानंतर 


उबेरच्या बिलिंगच्या तक्रारीचे व्हिडीओ सातत्याने समोर येत असून त्यावर ठोस काही मार्ग निघत नसल्याने कंपनीच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. कंपनीने या घटनेवर माफी मागितली आणि ही समस्या लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगितलं आहे.


दिल्लीतील ग्राहकासोबतही अशीच एक घटना 


नोएडातील दीपक टेंगुरिया या ग्राहकासोबतही अशीच घटना घडली होती. जेव्हा त्याने उबर ऑटो बुक केलं तेव्हा त्याचे भाडे फक्त 62 रुपये दाखवले जात होते. पण जेव्हा तो त्याच्या ठिकाणी पोहोचला तेव्हा त्याचे भाडे 7,66,83,762 रुपये झाले. यानंतर त्याच्या मित्राने या घटनेचा व्हिडीओ बनवला आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट केला.


ही बातमी वाचा: