Mukesh Ambani On N Chandrasekaran : रिलायन्स इंडस्ट्रीजचे (Reliance Industries) प्रमुख मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी मंगळवारी टाटा समूहाचे (tata group ) अध्यक्ष एन चंद्रशेखरन (N Chandrasekaran) यांचे कौतुक केले आहे. गुजरातमधील (Gujarat) गांधीनगर येथील पंडित दीनदयाळ ऊर्जा विद्यापीठाच्या 10व्या दीक्षांत समारंभात चंद्रशेखरन यांच्यासोबत एकाच व्यासपीठावर अंबानी उपिस्थत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ''एन चंद्रशेखरन (n chandrasekaran) हे देशातील व्यापारी समुदाय आणि तरुणांसाठी खरे प्रेरणास्थान आहेत.''
यावेळी बोलताना मुकेश अंबानी (Mukesh Ambani) म्हणाले की, टाटा समूहाचे (tata group ) अध्यक्ष एन चंद्रशेखरन (N Chandrasekaran) यांनी त्यांच्या दूरदृष्टी आणि दृढ विश्वासने अलिकडच्या वर्षांत टाटा समूहाला विकासाच्या एका वेगळ्याच उंचीवर नेहून ठेवले आहे. ते म्हणाले, "त्यांच्या नेतृत्वाखाली समूहाने उर्जेच्या क्षेत्रात उचललेल्या पावलांमुळे मी विशेषतः प्रेरित झालो आहे. नवीन ऊर्जा तंत्रज्ञानाच्या क्षमतेवर त्यांचा विश्वास दिसून येतो, असं ते म्हणाले आहेत. अंबानी (Mukesh Ambani ) म्हणाले, "चंद्रशेखरन (N Chandrasekaran) जी, तुम्ही तुमच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून या विद्यापीठाच्या पदवीधर विद्यार्थ्यांना प्रोत्साहन आणि प्रेरणा दिली याचा आम्हाला खरोखरच सन्मान वाटतो."
तत्पूर्वी ऊर्जा क्षेत्रातील आपल्या योजनांबद्दल बोलताना चंद्रशेखरन म्हणाले होते की, टाटा पॉवर आपल्या ऊर्जा व्यवसायाची क्षमता वाढवण्यासाठी पुढील पाच वर्षांत 75,000 कोटी खर्च करणार आहे. 2022-23 (FY23) आर्थिक वर्षात एकूण भांडवली खर्च 14,000 कोटीवर नेण्यासाठी कंपनी 10,000 कोटी खर्च करणार आहे. चंद्रशेखरन कंपनीच्या 103 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत असं म्हणाले होते. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले होते की, भारताला जर जगाचं उर्जा केंद्र बनवायचे असेल, तर अनेक व्यावसायिक गटांच्या एकत्रित इच्छाशक्ती आणि पुढाकाराने ते शक्य आहे.
दरम्यान, टाटा मोटर्स लिमिटेडने एक पूर्ण मालकीची सहाय्यक कंपनी टीएमएल स्मार्ट सिटी मोबिलिटी सोल्युशन्स लिमिटेडला स्वतःच्या ऑपरेशन आणि मेंटेनन्स मॉडेल अंतर्गत शहरी मास मोबिलिटी व्यवसाय करण्यासाठी समाविष्ट केली आहे. टाटा मोटोसर्न अलीकडेच आपल्या इलेक्ट्रिक कार निर्मितीचा 50,000 चा आकडा गाठला आहे. यामुळे टाटा मोटर्स ही भारतातली सर्वात जास्त इलेक्ट्रिक कार निर्मिती करणारी कंपनी बनली आहे.
इतर महत्वाची बातमी: