Indian Economy : भारत (India) हा जगातील सर्वात मोठी पाचवी अर्थव्यवस्था असणारा देश आहे. सध्या भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) ही 4 ट्रिलियनवर पोहोचली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेने गेल्या दशकात अनेक मोठे टप्पे गाठले आहेत. भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था (Fastest Growing Economy) आहे. पीटीआय (PTI) ने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या सप्टेंबर तिमाहीत देशांतर्गत बाजारातील एकूण थकबाकी बॉन्डमध्ये (Total Outstanding Bonds) वाढ झाली आहे. बॉन्डमधील ही वाढ मार्चमधील 2.34 ट्रिलियनवरून डॉलर 2.47 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचली आहे.


देशांतर्गत बाजारात खरेदी-विक्री बॉन्डमध्ये वाढ


पीटीआयने (PTI) ने दिलेल्या वृत्तानुसार, एकूण थकबाकी रोखे (Total Outstanding Bonds) मार्च 2023 मध्ये 2.34 ट्रिलियन यूएस डॉलरवरून सप्टेंबर 2023 पर्यंत 2.47 ट्रिलियन यूएस डॉलरपर्यंत वाढले आहेत. हे सर्व रोखे म्हणजेच बॉन्ड देशांतर्गत बाजारात व्यवहार केले जातात, असं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ( RBI - Reserve Bank Of India ) आकडेवारीचा हवाला देत अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. या एकूण थकबाकी रोख्यांपैकी (Total Outstanding Bonds), केंद्र सरकारचे बॉन्ड (G-Secs) दुसऱ्या तिमाहीत (Q2) 1.34 ट्रिलियन डॉलर होते, जे मार्च 2023 तिमाहीत 1.06 ट्रिलियन डॉलर होते.


कर्ज-जीडीपीचे प्रमाण घटलं


दुसरीकडे, रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे की, सरकारी आणि कॉर्पोरेट बाँड्स तसेच सावकारांकडून घेतलेले देशाचे एकूण बाह्य कर्ज, जून 2023 पर्यंत किरकोळ वाढून 629.1 अब्ज डॉलर झालं आहे. कर्ज-जीडीपी गुणोत्तर (Debt-GDP) प्रमाण 18.6 टक्क्यांवर घसरलं आहे.


आरबीआयची आकडेवारी काय सांगते?


आरबीआयच्या आकडेवारीनुसार, मार्च 2023 मध्ये विदेशी कर्ज 624.3 अब्ज डॉलर होते आणि त्यात सप्टेंबरपर्यंत 4.7 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. ते मार्च 2023 मधील 18.8 टक्क्यांवरून जून 2023 मध्ये सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (GDP) टक्केवारीनुसार 18.6 टक्क्यांपर्यंत घसरलं आहे.


1.34 ट्रिलियन डॉलरवर, सरकारी बॉन्डचा वाटा एकूण थकित बॉन्डपैकी 46.04 टक्के आहे, तर राज्यांचा बॉन्डचा वाटा 24.4 टक्के आहे, असं अहवालात म्हटलं आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, गेल्या काही काळापासून भारतीय अर्थव्यवस्था वेगाने प्रगती करताना दिसत आहे. सध्या भारत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे.


भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर


सध्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेत अमेरिका, चीन, जपान आणि जर्मनी हेच देश भारताच्या पुढे आहेत. सध्या भारत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे असून लवकर यादीत भारत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल असा दावा, अनेक तज्ज्ञ आणि अहवालांतून करण्यात आला आहे. अलीकडे, भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार प्रथमच 4 ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचला आहे. अनेक अहवालामध्ये दावा करण्यात आला आहे की, 2030 पर्यंत ती तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून नावारुपाला येईल.