Tomato Price Hike: सध्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना (Tomato Farmers) चांगले दिवस आले आहेत. कारण दिवसेंदिवस टोमॅटोची लाली वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. दरात मोठी वाढ झाली आहे. मुंबईत टोमॅटोचे दर (Mumbai Tomato Price) 100 ते 120 रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहेत. तर दिल्ली-एनसीआर भागात टोमॅटोचे किरकोळ दर हे 90 रुपये किलोवर पोहोचले आहेत. जाणून घेऊयात कोणत्या बाजारात टोमॅटोला किती दर मिळत आहे.
टोमॅटोच्या वाढत्या दराचा फायदा शेतकऱ्यांना
टोमॅटोच्या वाढत्या दराचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. तर सर्वसामान्यांच्या खिशाला वाढत्या दरामुळं झळ लागच आहे. मान्सूनच्या पावसामुळे दिल्लीसह अनेक राज्यांतील टोमॅटोच्या पुरवठ्यावर विपरीत परिणाम झाला आहे. टोमॅटोचे भाव गगनाला भिडू लागले आहेत. आझादपूर मंडी, गाझीपूर मंडी आणि ओखला भाजी मार्केट यांसारख्या दिल्लीतील अनेक मोठ्या घाऊक भाजी मार्केटमध्ये टोमॅटोच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. जिथे काही दिवसांपूर्वी किरकोळ बाजारात टोमॅटो 28 रुपये किलोने विकला जात होता, तिथे आता टोमॅटो 90 रुपये किलो झाला आहे.
पावसामुळे टोमॅटोच्या पुरवठा साखळीवर परिणाम
गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे टोमॅटोच्या पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे. मुसळधार पावसाचा कर्नाटक, हिमाचल आणि महाराष्ट्र यांसारख्या टोमॅटो उत्पादक राज्यांमधून जाणाऱ्या ट्रकवर विपरीत परिणाम झाला आहे. त्याचा परिणाम टोमॅटोच्या दरावर दिसून येत आहे. आठवडाभरात टोमॅटोचे दर 60 ते 70 रुपयांवर पोहोचले आहेत. गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे टोमॅटो पिकांवरही विपरीत परिणाम झाला आहे. पावसाळ्यामुळे टोमॅटो सडत असल्याने पुरवठा साखळीवरही परिणाम होत आहे. अशा स्थितीत कमी पुरवठ्यामुळे दरात वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
कोणत्या बाजारात टोमॅटोला किती दर?
मुंबई - 100 ते 120 रुपये प्रति किलो
दिल्ली - 90 रुपये प्रति किलो
मुरादाबाद - 70 ते 80 रुपये किलो
मेरठमध्ये - 80 रुपये किलो
गाझीपूर - 80 रुपये किलो
चंदीगड 50 रुपये किलो
मिळालेल्या माहितीनुसार, अन्नधान्याच्या महागाईत (Foodgrain inflation) कोणतीही घट झालेली नाही. गेल्या वर्षभरात बटाटे, कांदे आणि टोमॅटोच्या (potatoes-onion-tomato Price) दरात 81 टक्क्यांची वाढ झालीय. यामुळे व्हेज थाळीच्या किंमतीत देखील वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. बदलत्या हवामानाचा देखील शेती पिकांवर मोठा परिणाम होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळं शेती पिकांच्या दरात वाढ होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या: