मुंबई : सध्या अनेक कंपन्यां आपले आयपीओ (IPO) घेऊन येत आहेत. जून महिन्यात तीन छोट्या कंपन्यांचे दमदार आयपीओ गुंतवणुकीसाठी उपलब्ध असतील. यातील दोन कंपन्यांचे आयपीओ गुंतवणुकीसाठी खुले झालेले आहेत. मेडिकामेन ऑरगॅनिक्स, शिवालिक पावर कंट्रोल आणि दिंडीगुल फार्म प्रोडक्ट (एनन्यूट्रिका) अशी या तीन कंपन्यांची नावे आहेत. या कंपन्यांचे आयपीओ छोटे असले तरी ग्रे मार्केटमध्ये या कंपन्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. ग्रे मार्केट प्रीमियमकडे (GMP) पाहून शेअर बाजारावर सूचिबद्ध होण्याच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचा पैसा दुप्पट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या कंपन्यांचे शेअर ग्रे मार्केटमध्ये 176  टक्क्यांपर्यंतच्या प्रीमियमवर ट्रेंड करत आहेत. या तीन कंपन्यांपैकी डिंडीगुल फार्म प्रोडक्ट (एनन्यूट्रिका) आणि मेडिकामेन ऑरगॅनिक्स या कंपन्यांचा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला झालेला आहे.  


दिंडीगुल फार्म प्रोडक्ट (एनन्यूट्रिका) च्या शेअरची स्थिती काय? 


दिंडीगुल फार्म प्रोडक्ट या कंपनीचा आयपीओ 20 जून 2024 रोजी गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे. 24 जूनपर्यंत या आयपीओत गुंतवणूक करता येणार आहे. आयपीओ आला त्याच्या पहिल्याच दिवशी तो सहा पटीने सबस्क्राईब झालेला आहे. पहिल्याच दिवशी या आयपीओमध्ये रिटेल इन्व्हेस्टर्सचा कोटा 10.21 पटीने सबस्क्राईब झाला. आयपीओमध्ये या कंपनीच्या शेअरचा दर 54 रुपये ठेवण्यात आला आहे. ग्रे मार्केटमध्ये या कंपनीचा शेअर 70 रुपयांवर आहे. या कंपनीच्या शेअरचा ग्रे मार्केट प्रीमियम 130 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.  


मेडिकामेन ऑरगॅनिक्स कंपनीची स्थिती काय?


मेडिकामेन ऑरगॅनिक्स या कंपनीचा आयोपीओ 21 जून रोजी गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे. 25 जूनपर्यंत या कंपनीत गुंतवणूक करता येणार आहे.  सध्या या आयपीओच्या शेअरची किंमत 34 रुपये आहे. दुसरीकडे ग्रे मार्केटमध्ये या कंपनीचा प्रीमियम 60 रुपयांवर ट्रेंड करतोय. मेडिकामेन ऑरगॅनिक्स या कंपनीचा शेअर ग्रे मार्केटमध्ये 176 टक्क्यांनी ट्रेड करतोय. ही कंपनी राष्ट्रीय शेअर बाजारावर सूचिबद्ध होणार आहे.   


शिवालिक पावर कंट्रोलच्या शेयरची स्थिती काय


शिवालिक पावर कंट्रोल या कंपनीचा आयपीओ सोमवारी 24 जून रोजी गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. 26 जूनपर्यंत या आयपीओत पैसे गुंतवता येतील. सध्या या कंपनीच्या शेअरचे मूल्य 100 रुपये ठरवण्यात आले आहे. पण ग्रे मार्केटमध्ये हा शेअर 155 रुपयांवर ट्रेंड करतोय. या आयपीओच्या एका लॉटमध्ये 1200 शेअर्स आहेत.  


(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. आम्ही या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा या लेखामागचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)


हेही वाचा :


मोठी बातमी! ...तोपर्यंत फोन पे, क्रेड ॲपवरून भरता येणार नाही क्रेडिट कार्डचे बील; 30 जूननंतर काय बदलणार?


अनिल अंबानींची 'ही' कंपनी सुस्साट, एका लाखाचे झाले 23 लाख, गुंतवणूकदारांना मिळाले पैसेच पैसे!